मुसाफ़िर हूँ यारो..

         देश सेवे मधील(आसाम ) प्रवास.......         

    मित्रानो जय हिंद जय जिजाऊ जय शिवराय

                                  
                             

                 झुंझरका उठून विठ्ठल काकाच्या खारीत परसाकडला जाऊन येता येता धुर्या वरच्या लिंबाच्या झाडाची काडी ने  तोंड हिसळून .. सुर्य कासराबर वरी आला कि खुट्याचे ढोर सोडून बामण शिवारात चारायला नेणारा म्या.... ह्या असामी जंगलात  असा रमलो... 

           माझे नाव जनार्दन व्यंकटी पाटील भुते जन्म  12 जून 1993 साली मूळ गाव उमरज ता -कंधार जिल्हा नांदेड या ठिकाणी झाला  शिक्षण गावा मध्येच पुर्ण झाले नोकरी च्या ठिकाणी आसाम मध्ये आलेले अनुभव आठवणी व थोडी फार माहिती  तोडक मोडक्या शब्द मध्ये  लिहण्याचा प्रयत्न करतोय ....नक्किच प्रतिक्रिया दया ....... लहान पणा पासूनन च  मना मध्ये फौजी होन्याचे स्वप्न असलेले मुळे  मी  वयाच्या 18 व्या वर्षी फौज मध्ये आलो. ..         

प्रशिक्षण मधील फोटो 



                                                            
     १८.०४.२०१२.रोजी मी सीमा सुरक्षा बाल मध्ये  दाखल झालो  मला प्रशिक्षणा साठी आपल्या च महाराष्ट्र मध्ये  चाकूर या ठिकाणी पटवल्या गेले आपला भाग  असल्या मुळे मन रमले 12 महिन्याच  खडतर प्रशिक्षण  पूर्ण करून माझी पहिली पोस्टिंग 53 बटालियन सीमा सुरक्षा बल गांधीधाम गुजरात मध्ये झाली ..
 मित्रहो  संपूर्ण बॉर्डर पैकी भारत पाकिस्तान ला सीमा .Length: 3,323 kilometres (2,065 mi) एवढी व गुजरात राज्याला  (508 )KM लागते  सीमा सुरक्षा बल चे कामच हे आहे कि सीमेचे रक्षण करणे व बॉर्डर वासियांनच्या मना मध्ये प्रेम निर्माण करणे...आमची पहिली पोस्टिंग गुजरात आली . गुजरात मधील तीन महिने माझ्या साठी खूप कठीण परिस्थिसी चे गेले ... गुजरात मधील सीमा आमच्या हेड quter वरून  २०० किमी दूर होती .(ran of the kucth) म्हणून ओळखली जाते ...मोबाईल नेटवर्क पण नव्हते ...मोबाईल फक्त game  खेळायचे कामाचे ..गुजरात मध्ये एकच फोन होता तो म्हणजे DSPT  ,,,,BSNL  चा एक कॉल १.५ रु ,,,मिनिट  रेट ने कॉल चार्ज असायचा ... आम्हाला असे वाटायचे कि येतुन कधी दुसरे ठिकाणी जाता.......येतील कठिण प्रसंग म्हणजे मोबाईल नेट आणि दूर पर्यंत कोणीच नसे ..खूप ऊन ..गर्मी आणि कुठेच एक झाड पण नाही ,,,,,,चिटपाखरू दिसणं इकडे ना कोणते घर ना ना कोणते दुकान तीच माणसे रोज ची ....व पाकिस्तान च्या बाजू ने  सीमे च्या  पलिकडे  दूर डोंगरावर शेळ्य मेंढा घेऊन येणारी पाकीस्तानी नागरिक हे असायचे  या शिवाय काहीच नसायचे ..मे महिना सुरु झाला कि  एवढी धूळ उडायला सुरवात  व्हायची कि... नुसती टोपी सुद्धा डोक्य्वर राहाची नाही.... म्हणून आम्ही लोक कपडा व चष्मा वापरायचे .

                                           

कसे बसे मी  4 महिने काढले आणि ऑगस्ट महिन्या मध्ये आमचे यूनिट आसाम ह्या ठिकाणी जायचे ऑर्डर आला  व ..आम्ही 7 सप्टेंबर ला गुजरात च्या गांधीधाम वरून रेलवे मार्ग 8 दिवसाचा प्रवास करून आम्ही सर्वजण ...15सप्टेंबर 2013 मध्ये आम्ही आसाम च्या गोहावटी या शहरा मध्ये आम्ही पोहचलो . आसाम ची राजधानी (दिसपूर ) जरी असली तरी गोहावटी शहर  हे  संपूर्ण 7 sister of india चे मुख्ख्य केंद्र बिंदू आहे  seven  states – Arunachal Pradesh, Manipur, Meghalaya, Mizoram, Nagaland, Sikkim and Tripura.7 sister of India च्या कोणत्या पण राज्यात जायचे असेल तर तुम्हाला गोहावटी आले पहिजे .. गोहावटी पासून आमचे यूनिट 400.km (सिल्चर ) या ठिकाणी होत. आम्ही जेंव्हा गेलो तेंव्हा इंग्रजा च्या वेळी जाणारी छोटी वाली ट्रेन सुरू होती . ती ट्रेन आसाम मधून बांगलादेश जायची आता सुध्दा रेल मार्ग आहे पण जात नाही ...मोठे ट्रेन चे  काम सुरू होत  म्हणून आम्हाला बस ने ..जायला लागले व सुंदर असा प्रवास सुरू केला .  ......

                                     

   निसर्ग म्हणजे काय ? असा प्रश्न अनेक वेळा मानवी मनात निर्माण होत असतो. पण निसर्ग म्हणजे नेमके काय? असा प्रश्न जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा मला वाटत निसर्ग म्हणजे मानवाचा मित्र, सखा, सोबती आहे. जसे कि अनेक अंगांनी फुलणारा, उमलणारा, मानवी जीवनात उन्मेष भरणारा हा सखा निसर्ग. सतत बदलणारा, बदलवणारा, प्राण्या – पश्यांनी बहरलेला हा सखा निसर्ग, संवेदनांना रिझवणारा, चांगल्या विचारांना चालना देणारा ...फक्त देणारच, काही न मागणारा, हा सखा निसर्ग !
भारताच्या ईशान्येकडील रमणीय, नैसर्गिकदृष्टय़ा नटलेला आसाम पर्यटकांसाठी चांगले आकर्षण आहे. आसाम म्हणजे मनमार, तिबेट (चीन), भूतान, पूर्व बंगाल (बांगलादेश) या आंतरराष्ट्रीय सीमांना भिडलेला भाग आहे. गुवाहाटी हे आसाममधले महत्त्वाचे शहर. बाजूने जाणारी ब्रह्मपुत्रा नदी, घाटातून चालणारी बस वाहतूक, रमणीय हिरवागार डोंगराळ परिसर, शेती आणि बागाती परिसर पर्यटकांना आकर्षित करत असतो.

पूर्ण आसामात रेल्वेचे जाळे कमी असून बससेवा सर्वसामान्यांना परवडणारी आहे. या भागांतून तिस्ता, हुगळी, बराक, ब्रह्मपुत्रा नद्या वाहतात. साहजिकच हा परिसर शेतीने संपन्न आहे. इंडस्ट्री म्हणावी तशी नसल्याने शांत, प्रदूषणमुक्त परिसरातून प्रवास होतो. 
गस्त ..

                                   
                                                               
                                                             

आसाममध्ये प्रवास करताना नजरेच्या अंतापर्यंत नयनरम्य हिरव्या रंगाच्या विविध छटा सतत साथ करीत असतात. दुरवर पसरलेली भातशेती, त्यातील बांबूची कुंपणं घातलेली बांबूचीच टुमदार घरं, घरासमोरील हिरव्या वनस्पतींनी भरलेली तळी, हिरवे, तजेलदार चहाचे मळे, डोंगरमाथ्यापर्यंत पोचलेली केळी, बांबूची जंगलं यांनी आसामला मोहमयी बनविलं आहे .
स्थानिक पदार्थांची चव चाखत, लोकांशी संवाद साधत, तिथल्या संस्कृतीशी एकरूप होत साहसी प्रवासात प्रत्येकवेळी नव्या गोष्टींची अनुभूती घेत 400.km प्रवास करून आम्ही सील्चर या ठिकाणी पोहचलो . सिलचर हे आमचे मुख्य (head Quarter ) सिलचर वरून 150.Km दूर असलेल्या करिमगंज च्या भारत -बांगलादेश च्या बॉर्डर वर आमची ड्यूटी होती ..त्या ठिकाण चे काही अनुभव तुमच्या समोर .....
बांबुच्या कपा मध्ये चहा चा स्वाद ...
                                                         

                                                        

                                                        

आसाम  मधील करिमगंज जिल्हा मधील सिमा ही गावालगत जरी असली तरी काही भाग हा खूप जंगलामय आहे .ह्याच जंगलमय सिमेवर .. एक सुखद अनुभव आला ..भारत आणि बांग्लादेश यांची ठरल्या वेळ प्रमाणे नियोजीत बैठक होती आणि योगायोग माझा नंबर ह्या बैठकीला पडला ... मी अश्या खूप बैठकीला गेलेला होतो पण ही बैठक म्हणजे एक आठवणच ..  आमची सर्व टिम सकाळी सकाळी लवकर च निघुन घनदाट जंगल पार करून ठरल्या ठिकाणी बैठकी ला गेल्या होती  .... येथे गेल्या वर  बांग्लादेशी सैनिकांन सोबत बांबू च्या कपा मध्ये चहा पिण्याचा , आणि जंगली हत्ती पाहण्याचा .. हा वेगळाच अनुभव ह्या आसामी जंगलात आला......
फणस ::-

                                                       

                                                       

                                                          

                               

"कुटुंब वत्सल उभा फणस हा कटि खांद्यावर घेऊन बाळे" अशा कवितां मधुनच भेटणारा फणस आसाम मध्ये मात्र आपल्याला पावला पावलाला भेटतो. चहा आसामची राणी आणि फणस आहे राजा...

विस्तार कमी असतो. पानं असतात डार्क हिरवी आणि गळतात ही एकेक करुन, त्यामुळे झाड नेहमी हिरव दिसत. कायम सावली देत.
फणसाला फुल असं येतच नाही . साधारण डिसेंबर महिन्यात खोडाला डायरेक्ट छोटे छोटे फणसच लटकलेले दिसतात. साधारण फेव्रुवारी मार्च मध्ये फणस तयार व्हायला सुरवात होते. म्हणून
फणसाने बहरून गेलंल झाड पाहून राहवत नाही  म्हणून जवळ जाउन एक पिकलेल फणस तोडून पोट भर" गरे "खाण्याचा योगयेत असे.
बाहेरून जरी काटेरी असले तरी आतून गोड असलेला फणस
आसाम मध्ये आल्यावर नक्कीच याची गोडी चाखा !


 चहाच्या मळ्यातील भटकंती....

                                                            
चहाच्या मळ्याती ..

                                                       

                                                     

जहाँ डाल-डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा

वो भारत देश है मेरा....
पूर्वाचलचं नाव घेतलं की, कोणाच्या नजरेसमोर अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्किम. मणीपुर .नागालँड  अशा ठिकाणचं सृष्टिसौंदर्य उभं राहातं, तर कोणाला आसामच्या डोंगरउतारावर गालिच्याप्रमाणे पसरलेले चहाचे मळे दिसू लागतात.. इतकंच नव्हे तर उल्फा/बोडो संघटना, बांगलादेशी घुसखोरदेखील आठवतात; परंतु इथल्या सुपीक, पण दलदलयुक्त जमिनीला स्वत:च्या रक्ताचं पाणी करून सुजलाम-सुफलाम बनवणाऱ्या आसाममधील चहाच्या मळ्यातील मजुरांन माझा मानाचा मुजरा...
आजही चहाच्या मळ्यात काम करणार्या मजूरांना 70 रुपये दिवसाची हाजरी आहे ...
खरं तर या मजुरांची संख्या प्रचंड आहे. (आसामच्या एकूण लोकसंख्येच्या एकतृतीयांश) मात्र दारिद्रय़, मागासलेपण, शिक्षणाचा अभाव व बालमजुरी यामुळे यांचं आयुर्मान ५० वर्षांच्या आसपासच थांबलंय. काही वर्षांपूर्वी घुसलेले बांगलादेशीही आज इथे स्थानिक गणले जातात आहेत, परंतु या भूभागात पावणेदोनशे र्वष राहणाऱ्या या ‘सदानी’ भाषिक समाजाला आजही बाहेरचं मानलं जातंय. मात्र पिढय़ान्पिढय़ा गुलामीचं जीवन जगतोय हा मजूर... मी आणि माझा मित्र mahi आसामच्या करिमगंज भागातील एका चहाच्या मळ्यातील भटकंती करीत असताना घेतलेले काही क्षण ..
आसाम मधील जळू....
                      आसाम च्या  जंगलात फिरत असताना   
आसाम मधील प्रसिद्ध असलेल जोंक (जळू ) जंगलात व पाण्यात आढळते ... रक्ताचा वास आला की अंगावर चढते  असच आम्ही जंगलात फिरत असताना एक दिवशी ...माझ्या पाया वर असा हल्ला केला ...व नस पकडून अशी रक्त पित होती ..एकदा नस  पकडली की लवकर सोडत नाही तिच्या वर नमक टाकले की सोडते .. आसाम मध्ये फिरायचे म्हणजे खूप अवघड आहे .. ज्या ठिकाणी हिरवळ त्या जोंकच घर असते ... म्हणत्यात ना " दिसत तसं नसते म्हणून तर जग फसत ...
                               
जोंक ..
                                                          

                                                                  

आसामी टोपी :-


                                      
                                                                 

                                                          

असामी टोपी ही  शेतकरी ,कामगार, चाय बागेत काम करण्यार्या व्यक्ती साठी ही एक ईश्वर देणच .

उन्ह, पाऊस ,वारा ह्या कोणत्याही वेळी कामी येणारी ही आसामी टोपी... 
जापी टोपी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ही टोपी 
बाम्बू आणि palm झाडाच्या पानांपासुन बनविलेली मोठी टोपी ..
 रबड शेती :-
सायकलीपासून मोठ्या आणि जड वाहनांच्या टायरसाठी तसेच वेगवेगळया उद्योगधंद्यामध्ये, कारखान्यामध्ये रबराचा वापर फार मोठया प्रमाणात केला जातो.
                                 
रबड शेती 

                                                            


जवळपास ८0 टक्के नैसर्गिक रबराचाच वापर केला जातो, म्हणून रबर झाडांच्या लागवडीकडे जास्तीतजास्त अरुणाचलप्रदेश, आसाम ,गोवा, आंध्रप्रदेश, अंदमान-निकोबार इ. राज्यांच्या जास्त पाऊस आणि डोंगर उताराच्या भागात रबराची झाडे पहायला मिळतात. ही झाडे नैसर्गिक पध्दतीने किंवा अलिकडे लागवड पध्दतीने केलेली पहायला मिळतात.  आसाम च्या अश्याच एका रबड मळ्यात मध्ये फिरत असताना घेतलेले हे क्षण तुमच्या साठी .......

गोहाटी :------
                                  
ब्रम्हपुत्रा नदी 

गोहावटी शहर 

                                                     

हे शहर म्हणजे इशान्य भारताचे प्रवेशद्वार आहे. तसेच या भागातील सर्वात मोठे शहर. दिसपुर हे आसामच्या राजधानीचे शहर हे देखील गोहाटीच्या मध्यभागी आहे. युनायटेड किंगडम(U.K.) माध्यमाच्या सर्वे नुसार गोहाटी हे जगातील जलद वाढीसाठी प्रसिधद असणार्‍या १०० शहरामध्ये एक तर भारतातील जलद वाढत असलेल्या ५ शहरातील एक म्हणुन प्रसिध्द आहे. पुर्व-पश्चीम ४५ कि.मी तर उत्तर दक्षीण १४ कि.मी अशा परिसरात हे शहर पसरलेले आहे. ब्रम्हपुत्रेच्या दक्षिण किनार्‍यावर वसलेले हे शहर या नदामुळे समुद्र किनार्‍यावर वर वसलेल्या शहराचा आभास निर्माण करते. दमट हवामानामुळे येथे कायम गर्मी भासत असते. ब्रम्हपुत्रेचे पात्र काही ठिकाणी ६ ते ८ कि.मी तर सराइघाट येथील पुलाजवळ कमितकमी म्हणजे १-२ कि.मि. इतके आहे. नदित अनेक लहान मोठी बेटे असली तरी उमानंदा हे बेट गोहाटी शहरामध्ये असुन फारच निसर्ग रम्य असे आहे.



कामाख्या दुर्गा मंदिर :-


                         
कामाख्या मंदिर 


गुवाहाटीच्या अगोदर जेमतेम ४-५ किमीवर रेल्वेचं कामाख्या स्टेशन आहे. तेथून डोंगरावर कामाख्या म्हणून पुरातन दगडी बांधणीचं देवीचं जागृत स्थान आहे. देवीच्या प्रसिद्ध शक्तिपीठांपैकीतील हे एक आहे. तेथे देवीची मूर्ती नाही. मंदिराजवळ वास्तव्यासाठी व भोजनाची उत्तम सोय आहे.:-

शिलॉंग :- मेघालया मधील शिलॉंग या ठिकानचे काही क्षण .......

                          
शिलॉंग मधील क्षण ..


                                                         

शिलॉंग मध्ये ..

                                                                  




भूतान : एक आनंदवन :- 


पूर्व हिमालयाच्या दक्षिण उतरणीवर असलेले “ आनंदवन” म्हणजे भूतान. हा देश आर्थिकदृष्ट्या गरीब असलातरी आणि जगातील सर्वात आनंदी देशांपैकी एक देश म्हणून त्याची गणना होते. “Desitanation Happiness” असा ह्या देशाचा विशेष उल्लेख केला जातो. जगभर प्रवास करणारे फार थोडे पर्यटक हा देश पाहण्यासाठी तेथे आवर्जून जातात......
                                     
भूतान मधील दर्शन 

                                                    

                                                           
भूतानला “Land of Dragon” म्हणतात. ...मी आनंदवन म्हणतो. हिमालयातील स्वप्ननगरी म्हणतो. भूतानच्या तीन बाजूला भारत आणि उत्तरेला चीनच्या ताब्यात असलेला तिबेट आहे. पश्चिमेला सिक्कीम , पूर्वेला अरुणाचल आणि दक्षिणेला पश्चिम बंगाल आहे......
जगामध्ये सर्वात कमी वातावरण दूषित असलेला हा एकमेव देश. गौतम बुद्धावर अपार श्रद्धा असणारा आणि त्याच्यावर प्रेम करणारा, शांतीचा संदेश आचरणात आणणारा हा देश, एक धार्मिक देश आहे . आर्थिकदृष्ट्या खूप संपन्न नसला तरी अंगभूत अध्यात्मिक वृत्तीमुळे मानसिक शांती मिळत असल्यामुळे हे लोक सदा आनंदी . मला पण ह्या भूतान देशा मध्ये जाण्याचा योग आला ... भुटान देशाच्या सिमालगतच्या Gelephu.. ह्या छोट्या शहरात जाण्याचा योग आला होता .
काल लॅपटॉप पाहत असताना .. भेटलेल्या ह्या one years old movement अश्या ह्या लॅपटॉप मध्ये लपून बसल्या होत्या .. म्हणून आज पोस्ट करतोय.. खरंच जगामध्ये सर्वात स्वच्छ असलेला आणि , डोंगर, दर्या , नद्या निसर्ग सृष्टीने नटलेला, शांती संदेश देणारा देश बघायचा असले तर
नक्कीच एक वेळा भुटानला जा........
Bhutan happiness is a place..........
मित्र हो वाचा व नक्किच प्रतक्रिया दया ........
जनार्दन पाटील भुते ..

Start-up Street: Social justice and the start-up ecosystem

Disparities in start-ups are a global phenomenon and affirmative action is needed to ensure an equal opportunities environment for aspiring...