माझा प्रवास
माझा दक्षिण भारत (केरळ) प्रवास ......
" श्वास रोखून ठेवायला लावणारे सौंदर्य आणि स्वर्गीय अनुभूती म्हणजे मुनार जणू काही खूद देवाच्या देशातील सुयोग्य असं पर्यटन स्थळ . इडूक्की जिल्ह्यातील मुन्नार पश्चिम घाटात वसलेले आहे ....
प्रवास नियोजितच होता .. दोन्ह महिन्या पुर्वीच तिकीट घेऊन ठेवले होतं .. म्हणून सर्व प्रवास सोयीसकर झाला .. दि.11/05/2018 या दिवशी आम्ही सर्व जण ..( मि ,शिल्पा, संदीप आणि शिवाणी..) सायंकाळी 8 वाजता मनाला प्रसन्न करणारी एसटी महामंडळची नवीन वातानुकुलित थंड गार हवा देणारी .." शिवशाही " बस ने नांदेड हून हैदराबाद साठी प्रवास सुरू केला .. मराठ मोळ्या गीतांचा आनंद घेत ..आम्ही सकाळी सकाळी ..4 वाजता हैदराबाद बस स्टेशन ला पोहोचलो .. आमचे , फ्लाईट सकाळी 10 वाजता असल्यामुळे .. आम्ही निवांत पणे .. सिकंदराबाद बस स्टेशन वर चहा व नाश्ता करून आम्ही .. uber या टॉक्सी कंपनी कडून .. online टॉक्सी book करून राजिव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 12 मे रोजी सकाळी 0800 वाजता पोहोचल्या.. एअरपोर्ट मधील महागडे जेवण परवडण्या सारखे नाही .. म्हणून आम्ही सर्व जण बाहेर च जेवण करुन .. सकाळी 09 वाजता सर्व security चेक करून आम्ही .. विमानतळा मध्ये बोर्डींग केली ..आमचे हैदराबाद ते कोची तिकीट होते .. पण direct विमान नसल्यामुळे आम्हाला हैदराबाद ते बैंगलोर ते कोची असा हवाई प्रवास सुरू केला .. व आम्ही कोची विमानतळावर दुपारी 3 वाजता पोहोचलो ..
पहिली गोष्ट जी मला कोची विमानतळा च्या बाहेर आल्यावर जाणवली ती म्हणजे स्वछःता आणि शिस्त. मला खर तर विमानतळच फार आवडल. छोट आहे पण निट नेटक आणि स्वछः . तसे मी खूप लहान लहान विमानतळ पाहिली आहेत पण त्यातल हे सगळ्यात छान आहे अस मला वाटल. आम्ही बाहेर निघालो.. वातावरण खूप च गरम होतं भयंकर दमटपणा जाणवत होता .. ठरल्या प्रमाणे आम्ही मुन्नार ला निघालो .. कोची विमानतळा पासून मुनार 130 km मिटर अंतरावर आहे .. रस्त्यालगतचा सर्व प्रदेश जणू हिरवळींन माखलेला दिसत होता .. रस्ता सोडून इतर सर्व डोंगर चहाच्या मळ्यांनी व रबर बागांनी व्यापलेला होता .. जणू पुर्ण डोंगरावर हिरवी चादर पांघरल्याचा भास होतं होता ....
मुन्नार हे पश्चिम घाटांच्या रांगे मधील तीन टेकड्यांवर वसलेले ठिकाण आहे .. या तीन टेकड्या म्हणजे .. मुद्रापूझा, नल्लाथानी, आणि कुंडला देशी तसंच विदेशी पर्यटकांना आकर्षीत करणारे हे केरळ मधील महत्त्वाचा थंड हवेच ठिकाण .. मुन्नार प्रामुख्याने चहा, कॉफी , व मसाल्याच्या लागवडी साठी प्रसिद्ध आहे .. तिथे टाटा कंपनी तसंच केरळ सरकाचे चहाचे मळे आहेत ..
ह्या तीन तासाच्या प्रवासा मध्ये च तुम्ही मुन्नारच्या प्रेमात पडाल.. व जसं जस तुम्ही डोंगरावर गाडी जाईल तसतस .. तुम्हाला ढगामध्ये असल्याचा अनुभव मिळेल.. असा हा सुंदर प्रवास करून आम्ही सायंकाळी .. 0600 वाजता मुन्नार या ठिकाणी पोहोचलो ...
सर्व प्रथम आम्ही ...
स्पाईस गार्डन ( spice garden )..... या ठिकाणी भेट दिली हे ठिकाण आयुर्वेदीक वनस्पती व औषधांन साठी प्रसिद्ध आहे .. आयुर्वेदीक वनस्पतीच जतन केलं जात.. व प्रत्येक झाडांन जवळ त्याचे नाव लिहिलेले आहे .. इथली एक विशेष गोष्ट म्हणजे मसाले व इतर सर्व itms.. ह्या आयुर्वेदीक भेटतात.. व आयुर्वेदीक live चॉकलेट फॅक्टरी सुद्धा आहे.. येथे ..
माट्टपेट्टी dam...साठी निघाल्या
मुन्नार शहरापासून १३ किलोमीटर अंतरावर मट्टूपेट्टी हे पर्यटन स्थळ आहे. समुद्र सपाटीपासून १७०० मीटर उंचीवर वसलेले मट्टूपेट्टी येथे सुंदर तलाव व धरण आहे. तलावामध्ये नौकाविहार करता येते पण खूप मोठी गर्दी असल्यामुळे आम्ही botting केली नाही ..
टॉप स्टेशन.......
मुन्नारपासून सुमारे तीन किमी दूर अंतरावर असलेले टॉप स्टेशन हे समुद्र सपाटीपासून १७०० मी. उंचीवर आहे. मुन्नार-कोडईकॅनाल मार्गावरील हे सर्वात उंच स्थान आहे. मुन्नारला येणारे पर्यटक या स्टेशनला थांबून तेथून दिसणाऱ्या शेजारील तामिळनाडू राज्यातील विहंगम दृष्यांचा आनंद लुटतात. मुन्नारमध्ये विस्तृत प्रमाणात पसरलेली नीलकुरिंजीची फुललेली फुले पाहण्यासाठी देखील हे एक परफेक्ट स्थान आहे...... त्या नंतर ECO POINT .... इथली खासियत म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रांचे नाव उच्चारले तर समोरील डोंगरामधून तुम्हाला तुमचा च आवाज एेकू येईल ..ही मुन्नार मधील सर्वात लोकप्रिय जागा आहे .. आम्ही खूप वेळ आवाज देऊन ह्या eco point चा आनंद घेतला.. हे मुन्नार पासुन केवळ 15 km distance वर आहे .. हिरव्यागार झाडांनी व्यापलेला आहे ... हे पाहून आम्ही तो दिवस संपविला... व दुसरा दिवशी ...
tea garden चहाच्या मळे....
पाहण्यासाठी निघाल्या .. चहाच्या बागांची उत्पत्ती आणि विकासा साठी मुन्नार प्रसिद्ध आहे .. सर्वच उंच डोंगरावर चहाच्या बागा पसरलेल्या आहेत ... आणि त्या चहाच्या मळ्या मध्ये ..च खूप मोठे मोठे hotel सुद्धा आहेत .. काही hotel तर खूप जंगला मध्ये आहेत .. मुन्नार मध्ये अजुन खूप सुंदर आणि पाहण्या सारखे point आहेत ..
१) Nayamkad Waterfall
२) Chinnar Waterfall
३) Luckam Waterfall
४) Devikulam Tea Garden
५) Mattupetty Dam
६) Wagavurrait Valley Point
७) Eco Point
८) Elephant Point
९) Valley View Point
10) horse ride.
life मध्ये तुम्ही नक्की एकदा ह्या पर्यटन स्थळाला भेट द्या व निसर्ग रम्य मुन्नार चा आनंद घ्या ... मार्च एप्रिल मे महिन्यात जा...... धन्यवाद मित्रांनो ...
जनार्धन पाटील भुत्ते ...
BORDER SECURITY FORCE
रा.उमरज ता .कंधार जि. नांदेड..मो.9766738673 EMAIL.janubhutte@gmail.com













So nice 👍👍fojii...
ReplyDelete...🇮🇳Jai Hind.🇮🇳..
tnx boss
Delete