शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कोण करू शकतं??? शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर सर्वात पहिला प्रश्न पडतो की, मी हे करू शकतो का? किंवा हे करण्यासाठी मला काय करावं लागेल. हे कसं असतं? मला जमेल का? यात धोका आहे का? सगळं सोप्पं आहे. एकदा पाण्यात उतरलं की माणूस पोहायला लागतो तसं ह्या क्षेत्रात उतरलं की माणूस शिकतो. आधी शिकून ह्या क्षेत्रात उतरल्यास बुडण्याची शक्यता कमी असते आणि बुडू नये म्हणून कोणाचंतरी मार्गदर्शन घ्यावं लागतं किंवा काही बचावात्मक योजना कराव्या लागतात, त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करताना जाणकार माणसाचा सल्ला घ्यावा. शेअर बाजारात 18 वर्षांवरील भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. तो कितीही पैसे गुंतवू शकतो आणि हवेत त्यावेळेस गुंतवणूक संपवू शकतो. ही गुंतवणूक 1 ऋपायांपासून कितीही असू शकते. कुठल्याही कंपनीचा 1 शेअर किंवा अनेक शेअर तुम्ही घेऊन शकता. हा झाला मूळ भाग! सगळ्यात आधी => याचं अकाऊंट काढायचं कुठे किंवा कसं सुरू करायचं? तुम्ही तुमच्या बँकेतही हे खातं काढू शकता. याला डिमॅट खातं म्हणतात. तुम्ही बर्याेपैकी मोठ्या शहरात राहत असलात तर तेथील बँक डिमॅट खातं ही सुविधा उपलब्ध करून देऊ शकते. जर तुमच्या बँकेत ही सुविधा नसेल तर याच्या वेगवेगळ्या कंपन्या असतात. उदा. Angel Broking, Sharekhan, MotilalOswal, Anandrathi वगैरे. हल्ली Open Free Demat Account Online अशा जाहिरातीही असतात. जर विविध brokerage कंपन्यांचे ऑफिस तुमच्या शहरात असतील तर तेथे जाऊन तुम्ही हे खातं काढू शकता. ब्रोकर मार्फत हे अकाऊंट सुरू करता येतात. यात Demat Account म्हणजे नेमकं काय याची माहिती आपण नंतर घेऊच.
शेअर मार्केट म्हणजे काय?? |
आधी सांगितल्याप्रमाणे हा गुंतवणुकीचा एक पर्याय आहे. अगदी सोप्या अन सहज भाषेत सांगायचं झालं तर कमी किमतीत एखादी वस्तु घेणे अन जास्त किमतीला ती विकणे आणि त्यातून नफा कमावणे. हा झाला साधा-सरळ हिशोब. मग वस्तु घेताना ती कोणती घ्यायची, कशी जोखायची, पडताळून पाहायची हा अभ्यासाचा आणि कसबीचा भाग आहे. आता इथे वस्तु म्हणजे हातात घ्यायची वस्तु नसते. ते असतात शेयर्स!!! म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणूक म्हणजे, कमी किमतीत एखादा शेअर विकत घेणे अन योग्य किम्मत आल्यास तो विकून नफा कमावणे. उदा. “स्टेट बँक ऑफ इंडिया” ही राष्ट्रीयकृत बँक आहे. त्या बँकेचा शेअर आपल्या शेअर बाजारात उपलब्ध आहे. सध्या त्याची किम्मत 300 च्या आसपास आहे. आपण तो आपल्या डिमॅट खात्याच्या मार्फत विकत घेणार. मग Shares किती quantity मध्ये घ्यायचे हा निर्णय आपला असतो. अगदी एकपासून हजारोपर्यन्त आपण कितीही शेअर विकत घेऊ शकतो. अर्थात, आपल्या खात्यात पैसे असतील तर! समजा, 300 रुपये किम्मत असलेला “स्टेट बँक ऑफ इंडिया” चे 50 शेअर आपण घेतले. काही काळाने त्याची किम्मत 350 झाली आणि आपण तो विकून टाकला तर आपल्याला... विक्री किम्मत (350) – खरेदी किम्मत (300) = 50 रुपये एका शेअर मागे नफा झाला. असे आपल्याकडे 50 शेअर आहेत. म्हणजे 50*50 = 2500 रुपये हा आपला नफा झाला. [[ सूचना - ह्या खरेदी-विक्रीवर काही कर असतात. कंपनी (Angel Broking, Anandraathi इतर) त्यावर ब्रोकरेज आकारते. पूर्ण रकमेच्या अर्धा टक्का किंवा 0.2 टक्के वगैरे. ते वेगवेगळं असू शकतं. पण खूप जास्त नसतं. त्यानंतर सरकार त्यावर नेहमीचा कर लावते. तोही किरकोळ असतो. तुम्ही एखादा शेअर किती काळ जवळ बाळगू शकता किंवा कधी घेऊन कधी विकू शकता? उत्तर आहे कितीही काळ, कधीही... आज-आत्ता खरेदी केलेला शेअर तुम्ही आजच-लागलीच विकू शकता. आज खरेदी केलेला शेअर तुम्ही उद्या, परवा, महिन्यांनी, वर्षानी विकू शकता किंवा मेल्यावरही तो share तुमच्या demat खात्यावर तसाच राहतो जो वारसाला मिळतो. अजूनही शेअर बाजार समजला नाही??? |
एक शेतकरी आपल्या शेतात तूर करतो. त्यासाठी त्याला विविध प्रकारे खर्च येतो. म्हणजे बियाणे, खत, फवारणी इतर गोष्टी. ही झाली त्याची मूळ गुंतवणूक. गृहीत धरा ती गुंतवणूक 3000 रुपये आहे. मग काढणी झाल्यावर तो शेतकरी त्याची तूर घेऊन बाजारात जातो. त्याला गुंतवलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे येतील अन नफा मिळेल अशी अपेक्षा असते. जर त्या शेतकर्या ला पैशांची तातडीने गरज नसेल तर, त्याच्या मालाला बाजारात योग्य भाव येईपर्यंत तो वाट बघेल आणि योग्य भाव आल्यास तो माल विकेल. बाजारातील एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन त्याचा अंदाज असेल की त्याच्या मालाला 7000 रुपयांपर्यंत भाव मिळू शकतो, तर तो वाट बघेल. पण समजा, त्या शेतकर्या ला तातडीने पैशांची गरज आहे आणि नंतर भाव पडेल याची भीती किंवा साठवणूक करायला जागा नाही तत्सम कारणाने त्याने आहे तो माफक नफा पदरात घेऊन तो 5000 रुपयांना तूर विकून टाकतो. पण जर त्या शेतकर्यााने जास्त नफा येईल अशा अपेक्षेने तो माल विकला नाही अन काही कारणास्तव तुरीचे भाव कोसळले आणि त्याचा दर फक्त 2500 झाला तर त्याचं नुकसान होईल. याला त्याची RISK म्हणता येईल. एकंदरीत, बाजाराची परिस्थिती बघून निर्णय घ्यावा लागतो. अशा परिस्थितीत त्याला बाजारातील जाणकाराची (बाजारतज्ञ) आणि निर्णयक्षम व्यक्तीच्या सल्ल्याची आवश्यकता असते. हा बाजारतज्ञ त्याला काळ-वेळ-परिस्थिती व इतर बाबींचा अभ्यास करून त्या शेतकर्या ला योग्य मार्गदर्शन करून त्याला नफा मिळवून देण्यास सहाय्य करू शकतो. किंबहुना, हे बाजारतज्ञ, पुढच्या मोसमात कोणत्या पिकाला चांगला दर मिळेल हे हेरून कोणतं पीक घ्यावं याबद्दल शेतकर्यााला सल्ला देऊन मार्गदर्शन करू शकतात. यात दूसरा भाग असा... एक व्यापारी ज्याला पैसा कमवायचा असतो, शेतमालाची साठवणूक करायला गोदाम आहे, भविष्यात भाव पडले तरी होणारं नुकसान सहन करायची ताकत असते, पण कालांतराने त्या मालाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा असते अन बाजाराचा अभ्यासही असतो. तो व्यापारी शेतकर्याीकडून 5000 रुपयांना ती तूर खरेदी करून गोदामात ठेवतो. मग काही कारणास्तव तुरीचे भाव कमी-जास्त होतात, सरकारचा हमीभाव येतो पण व्यापारी न डगमगता ती तूर जवळ ठेवतो. काही दिवसांत (व्यापार्यारच्या अंदाजाप्रमाणे) मग तुरीचे भाव वाढतात अन तो व्यापारी ती तूर सात-आठ हजारांना विकतो. हा झाला त्याचा calculated risk आणि नफा! शेअर बाजारही असाच काहीतरी असतो. फक्त तुरीच्या जागी एखाद्या कंपनीचे शेअर असतात. शेअर बाजारात विविध कंपन्यांचे शेअर असतात. उदाहरण, बँक क्षेत्रात – SBI, Axis Bank इत्यादी. IT क्षेत्रात –TCS, Infosys इत्यादी. वाहन क्षेत्रात –Bajaj, Tata, Maruti Suzuki इत्यादी. असे विविध क्षेत्राशी निगडीत हजारो कंपन्यांचे शेअर असतात. त्यातील चांगल्या कंपन्यांचे आणि काळ-वेळ, बाजाराचा कल, देशातील राजकीय वातावरण, नैसर्गिक स्थिति अशा विविध बाबींचा विचार करून योग्य शेअर निवडता येतात.......
WHAT IS DEMAT ACCOUNT, DEPOSITORY AND DP |
ह्या क्षेत्रात येणार्याफ प्रत्येकाला Demat बाबत बरेच प्रश्न असतात. ज्या प्रकारे पैसे ठेवण्यासाठी, त्या पैशांचे सुलभरीत्या व्यवहार करता यावेत यासाठी बँक खातं असतं त्याचप्रकारे shares ठेवण्यासाठी, ते खरेदी-विक्री करण्यासाठी Demat Account ची आवश्यकता असते. एकंदरीत, shares ठेवण्याची जागा. जर तुम्हाला share market मध्ये गुंतवणूक करायची असेल तर Demat Account आवश्यक आहे. Shares ची खरेदी-विक्री आणि त्याला लागणारे पैसे याचे व्यवहार Demat Account द्वारेच होतात. ज्याप्रकारे Savings Account आपण विविध बँकेत उघडू शकतो, म्हणजे SBI, Axis Bank, HDFC bank त्याचप्रमाणे Demat Account ही विविध कंपन्याकडे सुरू करता येतं. ते बँकेतही उघडता येतं किंवा Angel Broking, Motilal Oswal, AnandRathi, Sharekhan अशा कंपन्यात broker च्या माध्यमातून सुरू करता येतं. जसे विविध बँकांचे विविध नियम किंवा अटी असतात पण मूळ कार्य एकच असतं त्याप्रमाणे Demat Account कुठेही सुरू केलं आणि तिथे विविध नियम-अटी असल्या तरी त्याचा मूळ कार्य सारखाच असतो. बँकेत savings account उघडण्याची प्रक्रिया असते जवळपास तशीच प्रक्रिया Demat Account सुरू करताना असते. यात काहीही अवघड नसतं. काही मूलभूत गोष्टींची पूर्तता केली तर कोणीही Demat Account सुरू करून share बाजारात गुंतवणूक करू शकतं. या Demat खात्याशी तुमच्या Mutual Fund Policies, Securities, IPO व्यवहार संलग्न करता येतात. ही Demat Account service विविध Depositories कडे असतात. CDSL (Central Depository Service Limited), NSDL (National Securities Depository Limited) ह्या भारतातील दोन Depositories आहेत. या विविध intermediaries मार्फत काम करत असतात. उदाहरणार्थ AngelBroking, MotilalOswal, Sharekhan वगैरे या Depository Participant असतात. एकंदरीत, Depositories ह्या गुंतवणूकदारांच्या securities (shares, bonds, mutual funds) electronic स्वरुपात जपून ठेवते आणि त्यांचा रेकॉर्ड ठेवते. Depository Participant हे गुंतवणूकदार आणि depository यांच्यातील दुवा असतात. सध्या भारतात NSDL आणि CDSL ह्या दोन depositories आहेत. जर मी माझं Demat Account Angel Broking कडे सुरू केलं असेल आणि Angel Broking ने जर ते CDSL कडे maintain केलं असेल तर माझी Depository आहे CDSL आणि DP झाली Angel Broking. Demat Account काढण्यासाठी साधारणपणे खालील कागदपत्रांची पूर्तता करावी लागते- 1. पॅन कार्ड झेरॉक्स 2. आधार कार्ड झेरॉक्स 3. लाइट बिल/फोन बिल 4. राष्ट्रीयकृत बँकेत खातं आवश्यक 5. बचत खात्याचं Updated पासबुक अन चेकबुक 6. पासपोर्ट साइज फोटो इत्यादी महत्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. वेगवेगळ्या कंपनीअनुसार त्यांची अकाऊंट ओपेनिंग फी वेगवेगळी असू शकते.......
(पुढील माहिती पुढच्या भागात....ही सर्व माहिती संग्रहीत आहे ) मी पण शेयर बाजारा मध्ये नवीनच आहे..... |
|
|
|