सैनिकाच जिवन...


सैनिकी जिवन..
"म्या आज संध्याकाळी डिवटीला निघणार हाव!
हे मझ्या माई ला कळाल....
तवा मझी माय मला येऊन म्हणाली..
..अरं "जनु "दोन दिसावर लक्ष्मीम्या आल्यात आणि गावात बी लई मोठा गणपती बसवलाय.."रोजच लई बघायचे काई काई हाय म्हणं.. आणि तु जाणार हाईस म्हणं 
तु आज जावु नको गणपती उठल्यावर जाए..
तवा मी म्हणालो माय .. सैनिकाच जिनच असं असत बघ.."ना कोणता सण "ना कोणता वार.. जावावच लागताय.. बघ ..
पण माय आम्ही जवा येता तवाच आमचा सण आणि बार्डरवर आमच्या साहेबांन गणपती बसवीलाय म्हणं ... तु काय बी घोर करू नको बघ... पुढे माय म्हणाली अरं ते टिवीत एगळच... काहीतरी दाखवालेत कि "रामरहीम बाबाच.. अरं म्हण दिल्ली हुन जाणार्या सगळ्या रेलवाई बंद हायत म्हण ... मी म्हणालो माय मी रेलवाई जाणार नाही ...म्या ईवायनात जाणार हाय! 
पुढे म्हणाली ..कुशाल चांगल र्हाय...
आणि म्हणाली अरं त्या आसामात तर पाणी पाऊस लई हाव म्हणं थोड जपूनच बघ.. वले कपडे घालू नको , पाण्यात लई भिजू नको .
म्या म्हणालो ठीक हाय... आणि म्हणाली " तुझ्या बागात शाळकडच्या रामराव काकाच्या ईतल दोन्ह किलू "तुपाच डब्ब हाय.. आणि दुसऱ्या ब्यागत "नुकतीचे उंढे आणि लाह्याचा चिवढा..हाय आणि भरणी भर आंब्याच खार बी हाय. . सगळे जण मिळून खा.......म्हणाली....
एक कविता आठवली ..
म्हणून म्हनतो आनंदानं भरावी तुझी वटी
पुन्हा एकदा जल्म घेवा माये तुझी पोटी
तुझ्या चरणी ठेवून माया धरावं तुजं पाय
तवा मले पायामंदी दिसती माझी माय
हंबरून वासराले …
जनार्धन पाटील भुत्ते 
मो.9766738673
सिमा सुरक्षा बल
आसाम

मायची हाताची न्यारी


फक्त नशीबवान असणाऱ्या लोकांच्या नशिबातच हे खाणं असत ....
रामपार्यात उठून विठ्ठल काकाच्या "खारीत "परसाकड जाऊन, येता येताच शंकर मामाच्या लिंबाची काडी नाय तर माझ्या माईन बनवलेली "राकोंडीन " ने तोंड हिसळून आमच्या माई ने केलेल्या पिवर दुधाच्या चाहाचा घोट घेउन म्या म्हशी घेऊन " खारवटाला" निघायचो . सोबत एक english ची dictionary असायची आमचा आणि english विषयाचा छतीसचा आकडा कधी चार शब्द पाठ झालं नाहीत .आमच्या गावातील पदमपल्ले मास्तर दररोज 10 शब्द पाठ करायला द्यायचे म्हणून मी चार शब्द तरी पाठ होतील ह्या हिशोबाने .. निघायचो आमच्या घरी सर्व मिळून २ म्हशी आणि एक शादुल जवळून घेतलेली कारवड होती .. आणि एक छोट बकर त्याचे नाव " खंड्या " सर्व मिळून ३ ढोर होती ... खारवटला ढोरांनी थोडंस तोंड आपटेल..
की म्या वडाच्या उतारी (नदीला ) नेऊन पाणी पाजवून . दावनीला आणून बांधायचे.. येळ तर लईच कमी मिळायचा शाळला तयार व्हायला म्हणून म्या हात पाय धूवून.. तेल पावडर करायचो.. आणि चुलिकड आमची ' माई' केलेल्या गरम गरम भाकर व" साय " आलेल्या दुधा बरोबर ताव मारायचो ..... म्हणून एक प्रसिद्ध अशी कविता आठवली ..
हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय
दिसती माझी माय..
हा फोटॊ पाहून पुन्हा त्या आठवणी जाग्या झाल्या .. माईच्या हाताच्या भाकर आणि दुधाच्या न्यारीची सर दुसऱ्या कोणत्याच जेवणाला नाय येणार ...
कोण कोण खाल्ले असं दुध आणि भाकर ...
जनार्धन पाटील भुत्ते ...
मो.9766738673 —

आसाम मधून ...

आसामी चहा....


आजची चहाच्या मळ्यातील भटकंती ....
जहाँ डाल-डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा
वो भारत देश है मेरा....
पूर्वाचलचं नाव घेतलं की, कोणाच्या नजरेसमोर अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्किम. मणीपुर . अशा ठिकाणचं सृष्टिसौंदर्य उभं राहातं, तर कोणाला आसामच्या डोंगरउतारावर गालिच्याप्रमाणे पसरलेले चहाचे मळे दिसू लागतात.. इतकंच नव्हे तर उल्फा/बोडो संघटना, बांगलादेशी घुसखोरदेखील आठवतात; परंतु इथल्या सुपीक, पण दलदलयुक्त जमिनीला स्वत:च्या रक्ताचं पाणी करून सुजलाम-सुफलाम बनवणाऱ्या आसाममधील चहाच्या मळ्यातील मजुरांन माझा मानाचा मुजरा...

आजही चहाच्या मळ्यात काम करणार्या मजूरांना 70 रुपये दिवसाची हाजरी आहे ...
खरं तर या मजुरांची संख्या प्रचंड आहे. (आसामच्या एकूण लोकसंख्येच्या एकतृतीयांश) मात्र दारिद्रय़, मागासलेपण, शिक्षणाचा अभाव व बालमजुरी यामुळे यांचं आयुर्मान ५० वर्षांच्या आसपासच थांबलंय. काही वर्षांपूर्वी घुसलेले बांगलादेशीही आज इथे स्थानिक गणले जातात आहेत, परंतु या भूभागात पावणेदोनशे र्वष राहणाऱ्या या ‘सदानी’ भाषिक समाजाला आजही बाहेरचं मानलं जातंय. मात्र पिढय़ान्पिढय़ा गुलामीचं जीवन जगतोय हा मजूर...
आज मी आणि माझा मित्र mahi आसामच्या करिमगंज भागातील एका चहाच्या मळ्यातील भटकंती करीत असताना घेतलेले काही क्षण चित्र थेट तुमच्या साठी आसाम मधुन .....
जनार्धन पाटील भुत्ते ..
मो-9766738673


गोधडी ..






माय ह्या आसामी परदेशात मन काही रमणा
तुझ्या हाताच्या गोधड्या बिना झोप काय येईना ....
माय खरचं या धावपळीच्या जगात
हरवलेली गोधड परत मिळेना.
आसाम मध्ये कडक थंडी ,थंडीचे कपडे घालून देखील ती जाणवत होती ...काही तरी जाणीव करून देत होती .मोठं मोठाले डोंगर ..धुकं चांगलीच पसरली होती .घरापासून तब्बल 3 महिने लांब माझ्या माईची आठवण सारखीच येत असते ती पण आठवण काढत असेल ना.. म्या तिचा लाडका आज जवळ जवळ 6 वर्ष पासुन घरापासून लांब राह्याची सवय झालीय पण येतेच आठवण त्या धुक्यात त्या गारठ्यात आठवणीच्या रिमझिम थेंबांचा छिडकाव चालूच
होता ..
आज मन भरलं ह्या आसामच्या थंडीमुळे माय आणि गोधड खूप आठवतेय
पण काय ती माया हरवून बसलोय ,गोंजारणारा मायेचा हात गमावल्या वाणी झालंय.
काल रात्री थंडीमुळे सारखं कूस बदलत होतो झोपच येत नव्हती वाटत होत ..माय माझी आतुरतेने वाट बघतेय ...विचार येत होते आणि माझ्या माईचा चक्क फोन आला मी वेळ न घालविता एकाच रिंग मध्ये रेसिइव्ह केला ...माय बोलली अरं जन्या थंडी लई हाय का रं" मी म्हणालो नाही ...
माय आपल्या इथल्या सारखी नाही . माझ्या माईला समजले असावे ..पुढे म्हणाली कानाला कानपटी बांधून झोप , सुटर घालत जाय..गरम पाणी पित...जाय म्हणजे थंडी काय वाजणार नाही... ...... एवढे बोलून माझ्या माईन फोन ठेवली ..
तुला कस सांगणार माय येथ लय थंडी हाय..त्या थंडीत त्या धुंदीत त्या धुक्यात गारठ्यात तुझ्या हाताने शिवलेल्या गोधडीची आठवण आली ...
जनार्धन पाटील भुत्ते..
मो.9766738673
आसाम..

Start-up Street: Social justice and the start-up ecosystem

Disparities in start-ups are a global phenomenon and affirmative action is needed to ensure an equal opportunities environment for aspiring...