फक्त नशीबवान असणाऱ्या लोकांच्या नशिबातच हे खाणं असत ....
रामपार्यात उठून विठ्ठल काकाच्या "खारीत "परसाकड जाऊन, येता येताच शंकर मामाच्या लिंबाची काडी नाय तर माझ्या माईन बनवलेली "राकोंडीन " ने तोंड हिसळून आमच्या माई ने केलेल्या पिवर दुधाच्या चाहाचा घोट घेउन म्या म्हशी घेऊन " खारवटाला" निघायचो . सोबत एक english ची dictionary असायची आमचा आणि english विषयाचा छतीसचा आकडा कधी चार शब्द पाठ झालं नाहीत .आमच्या गावातील पदमपल्ले मास्तर दररोज 10 शब्द पाठ करायला द्यायचे म्हणून मी चार शब्द तरी पाठ होतील ह्या हिशोबाने .. निघायचो आमच्या घरी सर्व मिळून २ म्हशी आणि एक शादुल जवळून घेतलेली कारवड होती .. आणि एक छोट बकर त्याचे नाव " खंड्या " सर्व मिळून ३ ढोर होती ... खारवटला ढोरांनी थोडंस तोंड आपटेल..
की म्या वडाच्या उतारी (नदीला ) नेऊन पाणी पाजवून . दावनीला आणून बांधायचे.. येळ तर लईच कमी मिळायचा शाळला तयार व्हायला म्हणून म्या हात पाय धूवून.. तेल पावडर करायचो.. आणि चुलिकड आमची ' माई' केलेल्या गरम गरम भाकर व" साय " आलेल्या दुधा बरोबर ताव मारायचो ..... म्हणून एक प्रसिद्ध अशी कविता आठवली ..
हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय
दिसती माझी माय..
हा फोटॊ पाहून पुन्हा त्या आठवणी जाग्या झाल्या .. माईच्या हाताच्या भाकर आणि दुधाच्या न्यारीची सर दुसऱ्या कोणत्याच जेवणाला नाय येणार ...
कोण कोण खाल्ले असं दुध आणि भाकर ...
जनार्धन पाटील भुत्ते ...
मो.9766738673 —

No comments:
Post a Comment