माझा विमान प्रवास .....
‘धरती पर अगर कहीं स्वर्ग है तो बस यही है.. यही है.. यही है..’ अशा धरतीवरच्या स्वर्गाच्या सफरीवर जायचे आहे, म्हणून मनात एक उत्सुकता होती ..
सिलचर पासून गोवाहटी रेल्वे ने प्रवास केला व सकाळी 10 वाजता गोहावटी विमानतळावर पोहोचलो .
विमानतळाच्या भव्य, सुसज्ज आणि सुरेख वातावरणात आम्ही प्रवेश केला. बॅगा चेकिंगसाठी पाठविण्यात आल्यानंतर मेटल डिटेक्टरमधून आणि नंतर मॅन्युअली तपासणी झाल्यावर आम्ही वेटिंगरूममध्ये थांबलो. टॉक-टॉक करीत चालणाऱ्या त्या टकाटक मुली, टाय सूट-बुटातले तिथले कर्मचारी, तिथली स्वच्छता, स्टॉल्स सगळंच कसं मनोवेधक
वेलकम सर,’ ‘वेलकम मॅम’ म्हणत स्वागत करणारी आणि खरोखरच सुंदर दिसणारी ‘हवाईसुंदरी आमचे स्वागत केले
विमानाच्या पायलट केबिनमधून हिंदी आणि इंग्रजीतून दिली जाणारी माहिती सर्वजण अगदी कान देऊन ऐकत होते. थोडय़ा वेळाने एक हवाईसुंदरी विमानाच्या मध्यभागी उभी राहून घोषित होणाऱ्या सूचनांप्रमाणे ‘प्रात्याक्षिक’ करून दाखवू लागली. ‘संकटकाळी स्वत:ला वाचविण्याचे प्रात्यक्षिक’ ती जेव्हा करून दाखवित होती,
काही वेळातच विमानाचे इंजिन सुरू झाल्याचा आवाज येऊ लागला धावपट्टीवरून आकाशाकडे झेप घेतली. ना धड जमीन. ना धड आकाश.. पूर्ण अधांतरी..! विमान आकाशात वेगवान झाले. थोडय़ा वेळाने दोन हवाई सुंदऱ्या चहा-कॉफी, खाद्यपदार्थाची ट्रॉली घेऊन आल्या. धावत्या विमानामध्ये कशाचाही आधार न घेता, अगदी आरामात त्या फिरत होत्या. ते बघून आमचा धीर चेपला..
काचेच्या खिडकीतून मी हळूच बाहेर पाहिले आणि पाहतच राहिले..आहाहा..नुसते कापसासारखे ढग.. जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत पांढरेशुभ्र ढगच ढग
केबिनमधून पुन्हा एकदा बेल्ट बांधण्याच्या सूचना आल्या. म्हणजे आता विमान जमिनीवर उतरणार .असा हा आमचा विमान प्रवास गोवाहटी ते हैदराबाद अतिशय आनंदात झाला पुढील प्रवास सुरू आहे .....
जनार्धन पाटील भुत्ते उमरजकर