काल रात्री आमच्या गावातील सयाची पंदलवाड भाऊ ने गावारान रान मेवा टेंबरं चे फोटो पाठवून जुन्या आठवणी ला पुन्हा पालवी फोडली...... म्या आणी पांडु मामाच एकन्या पहिली पासुन ते मॅट्रीक पर्यंत सोबत च.. एकन्या म्हणजे माझा जिवाचा जिवलग मित्र . आम्हाला शाळ्यत तर काय येतच नव्हत.. आम्ही म्हणजे शाळेतील दोन्ह वळण ' नसलेले विद्यार्थी भुत्ते गुरुजी चा मार खाउन दररोज हात सुजलेलेच असायचे तरी पण आमच्या वर काय फरक नसे ... दुपारच्या शाळेला कट
मारून आमचा दररोज चा एक च बेत असायचा तो म्हणजे गावरान रान मेवा हुडकायचा... गावरान रानमेव्या मध्ये टेंबर तर माझे समंद्याद जास्त फेवरेट... म्या आणि एकन्या " व्हळा व्हळा( नदी) ने उंबराच्या झाडा खालच्या मसोबाच्या पाया पडुन मसोबाच्या पुढे ठेवलेल नारळ खाउन पप्पु आणाच्या वावरातून व्यंकट सावकाराच्या मध्यल्या धुर्यान.. टेंबराच्या वावरात पोहचत असे.. टेंबराच्या झाडा कडे बघुनच माझ्या तोंडाला पाणी सुटत असे ... मला झाडावर तर चढताच येत नव्हते .. म्हणून एकन्या मला खाली बसवून एकन्याच्या बापान कंधाराच्या बाजारातून नवीन आणलेली थैली घेऊन ...कश्या ची न परवा करता माझा जिवलग टेंबराच्या झाडावर जायचा.. समंदे झाड लकाटून गेलेल असायचे ... एका फट्या वर जाऊन समंदी थैली भरून टेंबर आणायचा ... दोघ मिळून पोटभर टेंबर खाउन तिथल्या च व्यंकट सावकाराच्या विहीरीच थंड गार पाणी पिऊन आमची जोडी घराची वाट धरायची ...... एक म्हणं हाय बघा" दिसत तस नसंत म्हणून च जग फसत" ... ह्या आसामी जंगलात आज मला जवळपास 4 वर्षे संपले एवढे सुंदर निसर्ग आहे तो म्हणजे फक्त फोटॊ मध्ये च छान वाटतो..येथे कोणत्या रानमेव्याच झाड ना कोणत्या फळाच झाड... आमचच बर बा कंधारी माळरान... सालाचे बारा महिने काही ना काही आमच्या भागात रानमेवा असतो.. बिबे ,सिताफळ , रामफळ , जांबळ , बोर , चिंचा , टेंबर ........ जनार्धन पाटील भुत्ते ... मो-9766738673
No comments:
Post a Comment