शेअरबाजारातले तीन हुकुमाचे एक्के!...
मित्रांनो,
आज सकाळी आपल्या ग्रुपमधल्या एका सदस्याचा फोन आला होता.
आपले हे सदस्य शेअर मार्केटमध्ये बऱ्यापैकी एक्टीव्ह आहेत, त्यांनी मला असे सांगितले की ते ब्लु चिप कंपन्यामध्ये ट्रेडींग करतात.
दररोज पाचशे ते एक हजार रुपये कमवण्याची संधी ते शोधत असतात.
म्हणजे निफ्टीमधल्या कंपन्या मध्ये ते इंट्राडेसाठी गुंतवणुक करतात, जर सौदा फायद्यात सुटला तर ठीक नाहीतर त्या सौद्याला ते डिलीव्हरीमध्ये बदलतात आणि पुर्ण पैसे भरुन ते ब्लु चिप शेअर खरेदी करतात,
मग हे ब्लु चिप शेअर ते काही आठवड्यांसाठी किंवा काही महिन्यांसाठी सांभाळतात, आणि त्यांना हवा तो भाव आला की ते त्यांच्याकडचे शेअर्स विकुन टाकतात.
मित्रांनो, तुमच्यापैकी बरेच जण अशा पद्धतीची ट्रेडींग करत असाल.
ह्यात काही चुकीचे नाही, खरेदी करण्यासाठी ब्लु चिप शेअर्स निवडणे चांगलेच आहे.
पण ह्या रॅंडम पद्धतीने शेअर्स निवडण्याच्या पद्धतीमध्ये एकच धोका संभावतो.
तेजीच्या मार्केटमध्ये अनेक शेअर्सचा भाव विनाकारण गगनाला भिडलेला असतो,
बहुतांश स्क्रिप्ट सध्या ऑल टाईम हाय रेट वर ट्रेडींग करत आहेत,
अशा वेळी पोजिशनल ट्रेडींगसाठी भरमसाठ आणि महागड्या दराने ब्लु चिप शेअर खरेदी करणे सुद्धा चुकीचेच आहे.
अशा व्यवहाराने आपल्या पैशाची क्रयशक्ति म्हणजे कमवुन देण्याची शक्ती कमी होते.
आपल्या पैशाचा योग्य तो वापर करुन घ्यायचा असेल तर वाढलेल्या भावात गुंतवणुक करणे टाळले पाहिजे.
अनेक लोक तर्क देतात, की आम्ही आत्ता थोडे शेअर घेऊ, भाव कमी झालो की आणखी खरेदी करु.
ब्लु चिपमधल्या दहा बारा कंपन्यांमध्ये थोडे थोडे पैसे लावलेत, तर एव्हरेजींग कशात करावे?
आणि कोणत्या दरात करावे, ह्याविषयी कंफ्युजन वाढते.
एका पर्टिक्युलर स्टॉकमध्ये आपल्या भांडवलाचा मोठा हिस्सा गुंतवणे, आणि न चुकता एस आय पी किंवा एव्हरेजिंग करत राहणे, धोकादायक असते.
काही वर्षाखाली रिलायंस कम्युनिकेशन, डिएचएफएल, जेट एअरवेज, जेपी पावर, पी.सी. ज्वेलर्स हे सगळे ब्लु चिप स्टॉक्स होते.
जे लोक यांच्यामध्ये एव्हरेजिंग करत राहिले, त्यांचेच या कंपन्यांनी कपडे फाडले.
एका कंपनीवर भरवसा टाकणे म्हणजे आपली कष्टाने कमावलेली, घाम गाळुन कमवलेली संपत्ती, एका अनोळखी माणसाच्या हाती सोपवणे.
gmm pfaudler च्या प्रमोटर्सनी आपला ६९०० रुपये किंमतीचा शेअर एका झटक्यात ३५०० रुपयाला कसा आणला, आणि गुंतवणुकदारांचे पन्नास टक्के भांडवल कसे घशात घातले तुम्ही बघितले का?
इंडियाबुल्स हाऊझिंग असो वा यस बॅंक, शेअर घसरायला लागला, की कसा सुस्साट वेगाने कोसळतो, हे तुम्ही अनुभवले आहे का?
हे प्रकार कोणत्याही कंपनीत होवु शकतात,
तुम्ही घेतलेल्या स्टॉकवर हथौडा चालवणार नाही कशावरुन?
मग यावर काही उपाय आहे का?
तुम्हीही माझ्यासारखे जर थोडे डिफेंसिव किंवा कंजरव्हेटीव्ह विचारांचे असाल,
आणि कंपन्यांवर, त्यांच्या मॅनेजमेंटवर किंवा येणाऱ्या भविष्यावर तुमचा विश्वास नसेल तर तुमच्यासमोर तीन पर्याय उपलब्ध आहेत.
१) निफ्टीबिज –
Nippon India ETF Nifty BeES किंवा Reliance ETF Nifty BeES असे टाईप करा.
सध्या याचा भाव 210 आहे..
निफ्टी वाढला की निफ्टीबिज वाढतो. निफ्टी पडला की पडतो.
निफ्टीबिज मला आवडतो, कारण,
आयडीया व्होडाफोन सारखी एखादी नावाजलेली कंपनीसुद्धा मोटाभाईच्या करामतीमुळे दिवाळखोरीत जाऊ शकते, उध्वस्त होवु शकते,
पण निफ्टीबिज कधीच असा मातीमोल होणार नाही.
निफ्टीतल्या एखाद्या कंपनीने खराब परफॉर्मन्स दिलाच तर त्या कंपनीला निफ्टी पन्नास मधुन लाथ मारुन बाहेर काढतात, आणि एखाद्या उगवत्या ताऱ्याला निफ्टीमध्ये समाविष्ट करतात.
हे म्हणजे चित भी मेरी, पट भी मेरी असा प्रकार आहे.
निफ्टी भारत सरकारचं नाक आहे.
तो पडला तर सरकारची छी थु होते, आणि म्हणुन निफ्टी कृत्रिमरित्या मॅनेज केला जातो. कोरोना क्रायसिस नंतर निफ्टी चार महिन्यात पुन्हा मुळपदावर पोहोचला, याचे कारणसुद्धा ‘निफ्टीचे मॅनेजमेंट’ हेच आहे.
२) गोल्डबिज –
Nippon India ETF Gold BeES किंवा Reliance ETF Gold BeES ही माझी दुसरी आवडती स्क्रिप्ट आहे.
माझ्या जन्माच्या वेळी म्हणजे १९८४ मध्ये दहा ग्रॅम सोने फक्त १९७० रुपये होते.
मागच्या पस्तीस वर्षांमध्ये म्हणजे आज ते एक्कावन्न बावन्न हजार रुपयांना जाऊन पोहोचले आहे.
माझा नुकताच जन्मलेला मुलगा पस्तीस वर्षांचा होईल तेव्हा सोन्याचे भाव काय असतील?
आज तर जगात कधी नव्हे एवढी अस्थिरता आहे.
फिजिकल रुपात सोने घेणे आणि सांभाळणे आता पुर्वीइतके सोपे राहिले नाही, त्यात खुप धोके आहेत, फसवले जाण्याची रिस्क आहे, सोने चोरीला जाण्याची रिस्क आहे. जीव गमावण्याची risk आहे..
प्रत्येक वेळी दहा ग्रॅम सोने खरेदी करायला पन्नास पंचावन्न हजार कुठुन आणणार?
त्यावर जीएसटी भरावा लागणार तो वेगळाच!..
भाव वाढले तर बाजारात नेऊन विकणे, ही वेगळीच डोकेदुखी!..
दुकानदार सांगेल तो भाव मान्य करावा लागणार!..
कमोडीटीमध्येही लॉटचे भाव आपल्या आवाक्याच्या बाहेर असतात.
गोल्ड फंडामध्ये काही वर्षांचा लॉकिंग पिरेड असतो.
या सगळ्या झंझटमध्ये फसण्याऐवजी सध्या त्रेचाळीस, चौरेचाळीस रुपयांना मिळणारा गोल्डबिजचे जमतील तितके एक युनिट घेणे कधीही शहाणपणाचे आहे!..
भारतात अजुनही पब्लिक सोन्यासाठी क्रेझी आहे.
लग्नात पंचवीस तीस तोळे सोने अंगावर घातले नाही तर ते लग्नच कसले?
सर्वात जास्त ब्लॅक मनी सोन्यातच तर आहे.
हे भाव भविष्यातही असेच वाढत राहणार यात शंकाच नाही.
कंपन्या येतील, जातील, बुडतील, तरतील, पण सोन्यात केलेली गुंतवणुक कधीही डुबणार नाही.
भविष्यात सोन्याचे भाव अजुन पडले तर अजुन गोल्डबिज खरेदी करा.
आरामात उशीखाली ठेऊन पाच दहा वर्षांसाठी झोपी जा.
तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या लग्नासाठी किंव घर बांधण्यासाठी, भविष्यात जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा ह्या गुंतवणुका नक्की कामाला येतील.
२) बॅंकबिज –
Reliance ETF Bank BeES किंवा Nippon India ETF Bank BeES असे टाईप करा. याचा सध्याचा भाव दोनशे बारा रुपये आहे.
कितीही शिव्या दिल्या तरी बॅंका अर्थव्यवस्थेचा कणा असतात.
पैसा हे रक्त असेल तर बॅंका हे उद्योगाचे आणि जीडीपीचे ह्रद्य आहे.
ऑटो सेक्टर असो वा मेटल, बॅंकानी दिलेल्या लोन वरच हे प्रगती करतात.
आज बॅंकाची अवस्था वाईट आहे, पण भविष्यात पाच दहा वर्षांनी हे बॅंकाचे स्टॉक्स दुप्पट तिप्पट होणार यात मला तरी शंका नाही.
पण एका बॅंकेवर पैसे लावुन एव्हरेज करण्यापेक्षा निफ्टीबॅंकेमध्ये पैसे लावणे कधीही सोयीस्कर!..
पण निफ्टीबॅंकेला प्रत्येक आठवड्याला एक्सपायरी असते, याला डिलीव्हरीमध्ये घ्यायचे असेल तर एकमेव पर्याय आहे, बॅंकबीज!..
जी बॅंक खराब परफॉर्म करते, बुडते, तिला या बॅंकबीजमधुन बाहेर करतात,
याप्रकारे आपले भांडवल सुरक्षित राहते. हा लेख
(कॉपी पेस्ट आहे ) पण खूप सुंदर आहे... नक्कीच वाचा...
आपले एक तृतियांश भांडवल बॅंकबिजमध्ये गुंतवायला काहीच हरकत नाही.
---------------------------------------------------------------------
ज्याला शेअर बाजारातलं काहीच कळत नाही, आणि ज्याला शेअर बाजारातलं सगळंच काही कळतं, अशा दोघांनाही शेअर बाजारातले हे तीन हुकुमाचे एक्के निफ्टीबीज, गोल्डबीज आणि बॅंकबीज नक्कीच आवडतील.
धन्यवाद.............


Helpful
ReplyDeleteमनस्वी आभार
DeleteVery nice sir ...etf mahiti chan ahe
ReplyDeleteमनस्वी आभार महाराज
DeleteNice
DeleteKhupach chan kharch
Deleteखूपच छान पाटील
ReplyDeleteGood information sir
ReplyDeleteमनस्वी आभार साहेब...
DeleteNo risk गुंतवणूक
ReplyDeleteखूप छान सर
ReplyDeleteछान मार्गदर्शन सर
ReplyDeleteखूप चांगलं मार्गदर्शन मिळालं सर
ReplyDeleteउपयुक्त माहिती आहे physical gold पेक्षा bees केव्हाही चांगल्या
ReplyDeleteखूप खूप छान
ReplyDeletetnx
DeleteKhup chan lekh
ReplyDeleteमस्त एकदम..
ReplyDeleteKhup chan intraday vishiyi pan lihave
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteThanks bhava
ReplyDeleteखुप छान व उपयुक्त माहिती तीन हुकमी एक्के
ReplyDeleteनमस्कार सर
सुंदर माहिती सर.धन्यवाद..💐
ReplyDeleteSir खूप छान आहे
ReplyDeleteआपण खूपच छान मार्गदर्शन करत असतात धन्यवाद
ReplyDelete