सर्वांना विनंती......
जर तुम्हाला ऑप्शन मध्ये अभ्यास नसेल किंवा त्यामध्ये बिलकुल माहिती नसेल तर ऑप्शन ट्रेडिंग करु नका
ऑप्शन ट्रेडिंग हा मार्केट मधील एक प्रकारचा सर्वात मोठा लॉस करण्यासाठीचा प्रकार आहे असे समजा....
ऑप्शनमध्ये प्रॉफिट मिळवणे वाटते तितके सोपे नाही...
त्यासाठी खुप अभ्यास लागतो व त्यापेक्षा जास्त तत्परता लागते
आणि तुमच काळीज दगडाचे लागते
तर आणि तरच ऑप्शन मध्ये तुम्ही ट्रेडिंग करुन पैसे कमवु शकतात
त्याचबरोबर स्वतःची एक स्ट्रॅटेजी बनवा आणि त्यानुसार काम करा....
हे जमत नसेल तर सरळ कॅश मध्ये स्विंग करुन पैसे कमवा इंट्राडे करा रिस्क कमी आणि प्रॉफिटची हमी असते
रोज ५००-६०० कमवले तरी महिण्याकाठी १०-१२ हजा आरामात येतील
स्विंग मधुन तर खुप बनतील इतके बनतील त्याचा तुम्ही विचार करु शकत नाही....!
माझ्या असे लक्षात आले गृपवर आलेल्या स्क्रीनशॉट मुळे बरेच लोक ऑप्शन करायला लागले आहेत
परंतु तसे करु नका
२१०० वर असलेला रिलायन्स २३५० गेला १० शेअर घेतले असते तरी
२५०० प्रॉफिट आरामात मिळत होते
Dabur infy Wipro
असे कितीतरी शेअर्स आहेत त्यातून तुम्ही आरामात १००-२०० कॉंटेटी मध्ये भरपूर म्हणजे भरपुर रिटर्न्स मिळवु शकता
प्रॉफिट पैशात नाही टक्क्यात मोजा ५% १०% १५% किती तरी प्रॉफिट जमा होईल.....
शेअर मार्केट हा पैसे कमवण्याचा सागर आहे
पण त्यातुन किती आणि कसे आणि काय घ्यायचे हे ठरवा
त्यात पाणी आहे,मासे आहे,त्यात माणिक मोती आहेत,शिंपले आहेत
वाळु आहे मिठ आहे
आता आपल्याला काय घ्यायचे हे आपण ठरवा
एखाद्याला मोती भेटला तर तुम्ही चमकणारा दगड मोती म्हणून घेणार का ??
नाही ना ?
त्यामुळे संधी शोधा एखाद्या माशाच्या पोटात तुम्हाला मोती सापडेल वाळुत मोती सापडेल
फक्त योग्य संधीची वाट पहा....
म्हणजे एकंदरीत काय तर संयम ठेवा....
आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक पडझडीत शेअर्स घेत चला
कारण शेअर्स खरेदीची योग्य वेळ ही कोणती आहे हे कोणीही सांगु शकत नाही
शेअर्स लॉस वैगरे होत असेल तर त्याला लगेच विकुन टाका लॉसची चिंता करत बसु नका
तो लॉस तुम्हाला कोठेना कोठे भरुन मिळेल त्यामुळे लॉसला कवटाळून नविन संधी गमवत बसु नका
बाकी तुम्ही मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहात म्हणजे समजदार आहात हुशार आहात आणि जगासोबत चालत आहात असाच त्याचा अर्थ होतो....
कारण शेअर मार्केट इतके ज्ञान व शिकवण बाहेर कोणत्याही जगात मिळत नाही
*धन्यवाद*
मस्त
ReplyDeleteखूप छान 😊
ReplyDelete