शॉर्ट सेलिंग किंवा शॉर्टींग म्हणजे तुमच्या कडे एखादी वस्तू उपलब्ध नसताना ती विकणे.
शेअर बाजारात जर किंमत उंच किंवा जास्त वाटत असेल तर तुमच्याकडे तो शेअर नसला तरी तुम्ही तो आधी विकू शकता आणि मग विकत घेऊ शकता. सेल फर्स्ट बाय लेटर.
हे बेसिक शॉर्ट सेलिंग असते.
बिल्डर कडे तुम्ही फ्लॅट बुकिंग करता म्हणजे तो शॉर्ट सेलिंग करत असतो. एक किंवा दोन वर्ष झाल्या नंतर तो तुम्हाला तो फ्लॅट देतो म्हणजे सेल पूर्ण करतो.
शॉर्ट सेलिंग एक गूढ पण शिकण्यासारखं स्किल असते.
कार ड्रायवहिंग करताना रिव्हर्स ड्रायव्हिंग करणे कसे असते किंवा नेहमीं उजव्या हाताने लेखन करणाऱ्याला डाव्या हाताने लिहायला सांगणे असे कठीण असते.
शॉर्ट सेलिंग शिकले तर येऊ शकते पण बहुतेक 80%–90% लोकांना नैसर्गिक रीत्या आधी खरेदी करून मग विक्री करण्याची सवय असते. आधी विकून मग खरेदी करायला अधिक अनुभव लागतो.
माझ्या मते शेयर मार्केट मध्ये नीट विकत घेता येणे हे ग्रॅज्युएशन सारखे असते. विकत घेऊन प्रॉफिट करता येणे हे पोस्ट ग्रज्युएशन सारखे. आणि दहा वीस वर्षांत, पैसे ना बुडवता चांगली कमाई करून पोर्टफोलिओ करता येणे हे PhD करण्या सारखे आहे.......
छान लेख आहे सर
ReplyDelete