नमस्कार मित्र हो मी जनार्दन पाटील आज आपण स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय हा विषय समजून घेणार आहोत...स्विंग .ट्रेडिंग म्हणजे स्वस्तात खरेदी करा आणि महागात विका, किंवा त्याच्या उलट, आधी महागात विका आणि स्वस्तात खरेदी करा.
यासाठी अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत
१. Fundamental Analysis
२. Technical Analysis
तर तुम्ही एखाद्या स्टॉकचा अभ्यास करा, एखादी लेव्हल शोधा जिथे तुम्हाला तो शेयर खरेदी करण्याची उत्तम संधी मिळत असेल.
समजा रिलायन्स आता १५०० च्या भावात आहे, पण तुम्हाला स्टॉक चा अभ्यास करून समजत आहे की हा कदाचित ४०-५० रुपये पडेल आणि मग वर जाईल. मग तुम्ही तो स्टॉक १५०० ला खरेदी नाही करणार. तुम्ही वाट पाहाल तो १४५०-१४६० इतका पडेपर्यंत. जसा तो १४५०-१४६० ला पोहोचेल तसे तुम्ही सतर्क व्हाल आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की आता मी ठरवलेल्या लेव्हल जवळ आला आहे, आणि आता इथून पुन्हा वर जाण्याची शक्यता आहे तेव्हा तुम्ही तो खरेदी कराल…
आता तुम्ही जर लाँग टर्म ठेवणार असाल तर तुमचं टार्गेट तसं मोठं असेल, पण तुम्ही काही तास किंवा दिवसांसाठी ठेवणार असाल तर तुमचं टार्गेट वेगळं असेल. फक्त टार्गेट आलं म्हणून लगेच निघू नका, थोडी वाट पहा की नक्कीच इथून पडणार आहे का? जर पडत असेल तर निघा, नाहीतर थांबा…
अतिशय सोपं भाषेत 🙏🙏🙏
जनार्दन पाटील भुते मोबाईल -9766738673

👌खूप छान माहिती.... आहे
ReplyDelete