मेवाड भागातील एक वर्ष ( उदयपूर ).. the city of lakes

पंछी नदिया पवन के झोंके
कोई सरहद ना इन्हें रोके
सरहदें इन्सानों के लिए हैं
सोचो तुमने और मैने क्या पाया इन्सां हो के
पंछी नदिया ..............................

 

            ह्या ओळी प्रमाणे आपण सुद्धा जर पाखरे असता तर.. तर मनमर्जी कुठे पण फिरल्या असत्या... पण  आपण माणसे आहात... आपल्याला वेळातला वेळ काढून फिरावं लागतं.....

सप्टेंबर 2020 महिन्या पासून मला उदयपूर या ठिकाणी नोकरीनिमित्त जाण्याचा व एक वर्षे राहण्याचा योग आला मी माझं भाग्य समजतो... अशा लोकप्रिय पर्यटन स्थळांमध्ये मला राहण्याचा योग आला....... उदयपूर  मधील एक वर्ष कसे गेले, मला कळलंच नाही... झिलो की नगरी म्हणून प्रसिद्ध असलेले उदयपूर  हे शहर.. अहमदाबाद पासून 250  किलोमीटर आहे... व जयपुर पासून 450 किलोमीटर आहे.. उदयपूर हे भारत देशाच्या राजस्थान मधील  उदयपूर जिल्ह्याचे मुख्यालय व ऐतिहासिक शहर.... उदयपूर हे मेवाड प्रांताची राजधानी  होती.. उदयपूर ची स्थापना. महाराणा दुसरे उदय सिंह यांनी केली... उदयपूर हे राजस्थानमधील अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळ  आहे तिथला अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर अवलंबून आहे.,..तुम्ही जर कधी उदयपूर याठिकाणी आलात... तर नक्कीच हे खालील पर्यटनस्थळांना भेट द्या....

प्रेक्षणीय स्थळे..............

(1) फतहेसागर झील :-

उदयपूरच्या सौंदर्यामध्ये सगळ्यात जास्त भर टाकणारी कृतीम झील (तळे ) फतेहसागर आहे.... उदयपुर मध्ये फिरायला आल्यानंतर सगळ्यात जास्त बघितले जाणारी..व बाहेरुन फिरायला आलेल्या पर्यटकांसाठी आकर्षण चे केंद्र आहे.. फते सागर झील च्या काठी अतिशय सुंदर शांत निर्मळ मनाला प्रसन्न करणारे वातावरण आहे. एकदा गेल तरी पुन्हा दररोज जावं वाटणारे ठिकाण आहे. पर्यटकांसाठी दुसरे आकर्षणचे ठिकाण 'बोटिंग' ती सुद्धा उपलब्ध आहे. जवळच पाणीपुरी,पावभाजी उसाचा रस.. आणि सगळ्या प्रकारचे नाष्टयाचे गाडे उपलब्ध. आहेत.. आणि दुसरं म्हणजे फेमस "कुल्लडी चहा" याचा पण आंनद घेऊ शकता.. अश्या ह्या सुंदर कृतीम झील ची स्थापना महाराणा फत्तेसिंग यांनी केली... म्हणून या झील चे नाव '" फत्तेहसागर " आहे. अश्या खूप साऱ्या झील ह्या उदयपूर शहरामध्ये आहेत..म्हूणनच .उदयपूर ला "झीलो की नगरी" असे संबोधले जाते... उदयपूरला आल्या तर नक्कीच या ठिकानी भेट द्या....






(2) हल्दी घाटी...
हल्दीघाटी के युद्ध में मेवाड़ी वीरों ने
कोहराम मचाया था,
महाराणा प्रताप की वीरता देख
अकबर भी घबराया था॥
राजस्थान मध्ये असल्यामुळे.. राजस्थान मधील historical place. पाहण्याचा योग येत आहे.. चार दिवसापूर्वी हल्दीघाटी या ठिकाणी जाण्याचा योग.. Udaipur पासून 30km आहे..हल्दी घाटी का म्हणतात कारण तिथली माती ही पिवळी कलर ची आहे म्हणून हल्दी घाटी म्हणतात.... खूप लोकांना माहिती नसेल म्हणून मी थोडी माहिती जमा करून तुम्हाला पण सांगयच प्रयत्न करत आहे........
इतिहासामधील अतिशय (प्रसिद्ध) चर्चमध्ये असलेल युद्ध आहे.. 18 जून 1576 साली मेवाडचे राजा महाराणा प्रताप व मानसिंग यांच्या नेतृत्वामध्ये अकबरच्या च्या सेने सोबत हे युद्ध झाले आहे.या युद्धामध्ये मेवाड चे राज्या महाराणा प्रताप यांच्या जवळ अकबरच्या सैन्यापेक्षा अर्धे सैनिक होते.ही लढाई फक्त चार तास चालली होती... अरवली पर्वत च्या रांगेमध्ये ही लढाई झालेली आहे....महाराणा प्रताप जवळ सैनिक कमी होते पण.... त्याचं जवळ.. Gorilla war(म्हणजे अचानक हल्ला करणे ही युक्ती होती ) त्यांचे सैन्य चारी बाजूंना होते त्यामध्ये धनुष्य बाण तीर चालवणारी भिल समाजाची सैनिक सुद्धा होते......
महाराणा प्रताप यांच्या भाल्याचे वजन -81 kg त्यान्च्या कवच चे वजन -72 Kg महाराणा प्रताप हे युद्धाला जाताना..1 भाला 2 तलवार व कवच घेऊन युद्धाला जात होते..त्यांचा एक अतिशय चतुर बुद्धिमान तेज घोडा होता...त्याचे नाव -चेतक होते हल्दी घाटी च्या लडाई मध्ये चेतक चे कार्य खूप मोठे आहे..22फूट लांब उडी मारत होता... हल्दी घाटी च्या... लढाई चालू असताना महाराणा प्रताप हत्तीच्या वर चढून शत्रूला मारत असताना अकबरच्या सैन्यांमध्ये एका हत्तीने त्या घोड्याचा एक पाय कापला होता... तरी पण हत्ती ने महाराणा प्रताप यांना जंगला पर्यंत नेऊन सोडल होते....
हाच प्रसंग असा झाला.....
" चारी बाजूनं तलवार च्या आवाज
हत्तीची किंकारी, घोड्याच्या टापांचा आवाज... जखमी सैनिकांच्या किंकाळ्या हेच ऐकू येत होतं...
" प्रताप ने इसी दौरान चेतक को ऐंठ लगाई और मुगलों के सैनिकों को काटते हुए हाथी पर बैठे मानसिंह के सामने जा धमके। एक इशारे पर घोडे ने अपने दोनों पैर हाथी के माथे पर रख दिए तभी प्रताप ने भाले का भरपूर वार मानसिंह पर किया मान सिंह ओहदे में छिप गया और भाला महावत को जा लगा।
हाथी की सूंड में पकड़ी तलवार से चेतक का पिछला पैर कट गया। घायल चेतक को देख मुगलो ने प्रताप को घेर लिया। इसी बीच प्रताप के हमशक्ल झाला मान और दूसरे राजपूत सरदार प्रताप को युद्ध मैदान से सुरक्षित निकालने में लग गए। झाला मान ने राज मुकुट धारण कर लिया जिससे दुश्मन उन्हें प्रताप समझ उनपर टूट पड़े।
इधर स्वामिभक्त चेतक घायल होते हुई भी मेवाड़ के प्रताप को युद्ध भूमि से सुरक्षित निकाल ले आया। उसने 3 टांग पर ही 22 फीट के बरसाती नाले को पार कर लिया और फिर प्रताप की गोद में प्राण त्याग दिए। आज चेतक की समाधी पर लोग शीश नवाते है। प्रताप ने इस युद्ध के बाद अटल प्रतिज्ञा कर ली और जंगलो में रहकर दुश्मनो से लोहा लेते रहे लेकिन अकबर की गुलामी स्वीकार नहीं की "
राजस्थान ला आल्या तर नक्की एकदा ह्या ठिकाणी भेट द्या... व पूर्ण इतिहास समजून घ्या.... जवळ पास खूप साऱ्या,historical place आहेत....शाही बाग, हल्दीघाटी , प्रताप गुहा, चेतक समाधी आणि महाराणा प्रताप स्मारक भेट देण्यासारखे आहे. भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या सर्व साइट्स भेट देण्याजोग्या आहेत. शासकीय संग्रहालय नसल्यामुळे खासगी आस्थापनेने हल्दीघाटीपासून 3 किमी अंतरावर असलेल्या बालीचा गावात 100 रुपयांची प्रवेश शुल्क घेऊन.संग्रहलय तयार केल आहे ते पाहू शकता....














(3) राजस्थान मधील प्रसिद्ध किल्ला कुंभलगड.....
या ठिकाणी 29-03-2021 ला जाण्याचा योग आला. राजमदं जिल्ह्यात मधील जंगलात मध्ये हा किल्ला आहे...udaipur पासून 80 KM दूर आहे.... कधी UDAIPUR ला आल्या तर नक्की हा किल्ला बघा...... अतिशय सुंदर किल्ला आहे.. ह्या केल्या वर महाराणा प्रताप यांचा जन्म झाला आहे.... ह्या किल्ल्वर खूप सारे मंदीर आहेत.. जगात दुसरी मोठी भिंत ह्या किल्या च्या बाजूने आहे.....जवळ खूप सारे हॉटेल व रिसॉर्ट बनवले आहेत.. जग भरातून. खूप सारे लोक हा किल्ला बघायला येतात....... समुद्र सपाटीपासून 1100 मीटर उंच आहे... हा किल्ला अरवली पर्वत रांगेवर आहे......ह्या किल्या वर संपूर्ण मिळून सात दरवाजे आहेत.. व किल्ल्यावर 360 मंदिर आहेत त्यामधील 300 मंदिर आहेत प्राचीन जैन धर्माचे आहेत बाकी मंदिर हिंदूच आहेत.. या किल्ल्याची दिवार ( भिंत) 36 किलोमीटर दूर आहे... त्या किल्ल्याचे निर्माण राणा कुंभा त्यांच्या कार्यकाळात मध्ये झाले ... ह्या किल्ल्याला "ग्रेट वॉल ऑफ इंडिया" या नावाने सुद्धा ओळखले जाते.,...










(4) सज्जनगड मान्सून पॅलेस :-
आरवली पर्वत रांगेत मध्ये... उंच डोंगरावर स्थित हा किल्ला आहे.. सज्जनगड पॅलेस हे मेवाड राजवंशाचे शाही निवासस्थान आहे..मान्सून पॅलेसचे बांधकाम करणारे महाराणा सज्जन सिंह हे मेवाड राजवंशाचे 72 वे शासक होते. मान्सून पॅलेसच्या वरच्या बाल्कनीतून, संपूर्ण उदयपूर शहर, तिचे सर्व तलाव, राजवाडे आणि किल्ले, तसेच मेवाडांचे वडिलोपार्जित घर, चित्तौडगढ यांचे भव्य दृश्य मिळू शकते. कदाचित या कारणास्तव हे ठिकाण महाराणा सज्जन सिंह यांनी स्वतःच्या महल वेधशाळेसाठी निवडले होते. खुद्द महाराणा फतेह सिंह यांनी बांधलेल्या फतेह सागर तलावाच्या संपूर्ण भागाचे प्रत्यक्ष दर्शन होऊ शकते.....





सहेलियों की बाडी ;-

उदयपूर मध्ये फतेपुरा सर्कलमध्ये,. एक बाग आहे... चारी बाजूंनी तलावांमधील कमळ आहेत संगमरवरची हत्ती आहेत... ह्या बागेचे बांधकाम संग्राम सिंह यांनी केलं आहे... उदयपूरला आलेले सर्व पर्यटक ह्या ठिकाणी एक वेळा अवश्य भेट देतात., तुम्ही जर कधी गेलात तर नक्की जा..






जगदीश temple :-

उदयपूरच्या मध्यभागी... सिटी पॅलेस च्या पुढे एक सुंदर हिंदू मंदिर आहे, पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे... जगन्नाथ रायच मंदिर आहे... पण सगळे जगदीश असे म्हणतात....






सिटी पॅलेस :-

राजस्थान हे चारी बाजूंनी अरावली पर्वत रांगांनी घेरलेलं आहे... सिटी पॅलेस बनवायला सुरुवात महाराणा उदय सिंह द्वितीय यांनी केली होती.. पूर्ण सिटी पॅलेस बांधायला चारशे वर्ष लागले होते., आज सिटी पॅलेस भारत व राजस्थान मधील सगळ्यात मोठा, राजवाडा आहे( महल ) पर्यटक सगळ्यात जास्त बघितला जाणार महल आहे..... हिंदू आणि राजपूत वास्तुशैली मध्ये निर्माण केलेला महाल आहे..... ह्या राजवाडा ला चारशे वर्ष एवढा मोठा वेळ लागण्याचे कारण असे... कारण खूप आगळ्यावेगळ्या वास्तूकला बनवल्या आहेत म्हणून एवढा मोठा वेळ काळ लागला.. सिटी पॅलेस बनवण्यासाठी संगमरमर, आणि ग्रॅनाईट यांचा वापर केलेला आहे.., ह्या महालाच्या वरून संपूर्ण उदयपूर दिसत... सुरक्षा आणि दुश्मनाच्या आक्रमणा पासून वाचण्यासाठी खूप सारे चोर रास्ते व भूल भुलैया रस्ते आहेत.... आज सिटी पॅलेस सर्व देशातील पर्यटकांसाठी खुले केलेला आहे... आणि काही हिस्सा.... हॉटेल साठी आहे.... सिसोदिया राजपरिवार चे महाराणा अरविंद सिंह जी मेवाड आणि त्यांचा परिवार आज सुद्धा तिथे वास्तव्यास आहे.., अतिशय सुंदर असलेला हा महाल., त्याला पाहण्यासाठी तीनशे रुपये फी आकारली जाते.... संपूर्ण महालाला प्रायव्हेट सिक्युरिटी आहे.,,... जर तुम्ही कधी येथे आलात.... कमीत कमी दोन तास लागतो हा महाल पाहण्यासाठी..,.. जवळच फते सागर आहे.. व त्यामध्ये बोटिंग सुद्धा उपलब्ध आहे......खूप सार्‍या जुन्या वस्तू पर्यटकांसाठी.,बाहेर काढून लावण्यात आलेले आहे.,..







करणी माता मंदिर :-

 श्री मंशापुरण करणी माता मंदिर,.
 हे एक हिंदू देवीच मंदिर आहे., मचला मग्रा पहाडीवर आहे. दगडाची सुंदर मूर्ती आहे .. उदयपूर मधील दुध तलाई झील  जवळच आहे, या मंदिरापासून संपूर्ण उदयपूर दिसते... ह्या मंदिराजवळ वाहने जात नाहीत....... तेथे जाण्यासाठी... Ropeway चा वापर केला जातो.,.........








माउंट आबू :-

माउंट आबू राजस्थान मध्ये असं एकमेव हिल स्टेशन आहे आतीशय शांत वातावरणामध्ये...आहे राजस्थान मधील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे... माउंट आबू अरवली पर्वताच्या एका रांगेमध्ये आहे.... माउंट आबू हे लोकप्रिय जैन तिर्थ स्थळ आहे., राजस्थानचे एक मात्र प्राचीन हील स्टेशन आहे... जुन्या प्राचीन कथेमध्ये पवित्र अशा माउंट आबू पर्वतावर 33 कोटी देव भ्रमण करतात असे मानले आहे... माउंट आबू अरवली पर्वत माळी मध्ये नक्की झील आहे.... अतिशय सुंदर व पर्यटकांसाठी आकर्षणचे स्थान आहे. नक्की झील ही भारतातील पहिली मानवनिर्मित झील आहे... हीझील माउंट आबू च्या मध्यभागी आहे...सुंदर असी हिरवळ चारी बाजूने उंच उंच डोंगर. माउंट आबू वर चालणारे थंडगार हवा... अतिशय सुंदर असे वातावरण या ठिकाणी., जर एकदा तुम्ही बोटिंग केले तर मन प्रसन्न होत... हे झील फोटोग्राफीसाठी अतिशय सुंदर आहे...









गुरुशिखर....

माउंट आबू पासून पंधरा किलोमीटर दूरवर स्थित आहे... ह्याची उंची समुद्र सपाटीपासून 1722 मीटर उंच आहे... जर तुम्ही ह्या ठिकाणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये गेल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला,, सुंदर असे ढग दिसतील...व धुंद दिसेल....... अतिशय सुंदर माउंट आबू मधील सगळ्यात उंच ठिकाण आहे... जवळचा हनिमून पॉइंट सनसेट पॉइंट व गोमुख मंदिर ब्रह्मदेव मंदिर दिलवाडा मंदिर... खूपसे पर्यटन स्थळ आहेत आम्ही काही मोजक्याच ठिकाणी गेल्या होत्या,, तुम्ही गेलात तर नक्की याचा आनंद घ्या... त्या ठिकाणी.. हॉर्स रायडिंग.,... व खूप काही गोष्टी चा आनंद घेता येतो..


Biological Park Udaipur Rajasthan :-








जवळच नाथद्वारा हे ठिकाण आहे.... कृष्णाचा एक अवतार त्या ठिकाणी झाला होता., असे आमचे एक वर्षे, उदयपूर या ठिकाणी गेलेली.., अजून खूप सारे पर्यटन स्थळ जवळपास आहे.... नक्कीच कधी उदयपूर फिरायचा योगा आला तर हा सर्व ठिकाणी जा नक्कीच एक वेळ आगळा वेगळा आनंद भेटलं....
खूप काही लिहायचं होतं... ते राहून गेलं काही चुकलं असेल लिहिण्यामध्ये तर नक्की माफ करा... व कधी आलात तर सर्व पर्यटन स्थळांचा मनमुराद आनंद घ्या........ life is not once more आनंदी रहा व प्रवास मय जगा...,.....आठवणे आणि विसरणे या गोष्टी वर वर साध्या वाटल्या तरी आयुष्यात महत्वाच्या असतात. आपल्या आठवणी म्हणजे आपण व्यतीत केलेले जीवन! आपण आपल्या अनुभवांनी आणि आठवणींनी घडतो. अनुभव शहाणपण शिकवतात. आपल्या जीवनाचा मुख्य दस्तऐवजच तो! म्हणूनच आठवणींना मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात तशाच पडू देणे योग्य नाही. मधून मधून उसंत मिळेल तेव्हा आपल्या आठवणींचा धांडोळा घेतला पाहिजे. विशेषतः आपल्या मनाला बळ देणाऱ्या आठवणींची जपणूक केली पाहिजे.अश्याच काही आठवणी मी आज जपून ठेवून उदयपूर या ठिकाणापासून निरोप घेतो..,.. By by udaipur........ नक्क्की तुमच्या प्रतिक्रिया मांडा....
जनार्दन पाटील भुते... मोबाईल -9766738673




2 comments:

  1. सर खरच तुम्ही भाग्यवान आहात. या ब्लॉगद्वारे खुप छान आठवणीची तुम्ही जपवणूक केली खुप-खुप धन्यवाद.इतक्या दुरवर असुन देखिल माय मराठीत या आठवणीला ताजे केले. मी आपले सगळे ब्लॉग वाचले खुप सुंदर खुप छान ब्लॉग व लेखन आहे.

    ReplyDelete

Start-up Street: Social justice and the start-up ecosystem

Disparities in start-ups are a global phenomenon and affirmative action is needed to ensure an equal opportunities environment for aspiring...