@ प्रेरणा @
प्रॉफिट_अशान_भेटायचा_नाही_रे!!
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा छान अभंग शेअर मार्केटच्या मध्ये सुधा लागू पडतो. राष्ट्रसंतांनी त्यांच्या अभंगांमध्ये देवा साठी कश्या प्रकारचा मनामध्ये भाव असायला हवा, श्रद्धा कशी हवी आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या मनातील भवाप्रती असलेले आपले समर्पण म्हणजे देवत्व अशी कल्पना त्यांनी त्यांच्या अभंगांमध्ये,
मनी नाही भाव म्हणे,
देवा मला पाव......
देव अशान भेटायचा नाही रे...
देव बाजारचा भाजीपाला नाही रे...
खरच मित्रहो,आपल्या भूमीतील राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा आपला वसा घेतल्यास कशाचीही कमी पडणार नाही, मग ते शेत्र कोणते का असेना..
स्विंग ट्रेडिंग साठी काय करावे काय करू नये यासाठी केलेला हा लेखन प्रपंच...
* ट्रेड ची तयारी:
ट्रेड ची तयारीत असताना खालील प्रश्न विचारा..
१. किती दिवसाची टाईम फ्रेम आहे?
२. किती काळ ट्रेड मध्ये थांबणार?
३. किती लॉस ला बाहेर पडणार?
४. किती प्रॉफिट वर बाहेर पडणार?
५. तुमचा entry signal काय आहे?
ह्या प्रश्नाची उत्तरे आपल्याकडे आल्या नंतर पुढील प्रश्नाची उत्तरे आपल्या कडे असू द्या...
तुम्ही म्हणाल की येवढे प्रश्न तर मी कधी विचारले नाहीत..मित्रहो हे नियम आहेत....जगातील प्रोफेशनल स्विंग ट्रेडर्स चे..
१. हा स्टॉक त्याच्या सेक्टर मधील leader आहे का?
२. हा स्टॉक ब्रेक आउट मूड मध्ये आहे का?
३. याचे volume वाढत आहे का?
४. Overall market ची direction सोबत तो चालतो का?
५. MACD इंडिकेटर ने मागील ३ दिवसात बाय सिग्नल दिला आहे का?
* प्रत्येक सेक्टर मधील leader stock निवडा..
* तुमच्या भावणावर ताबा मिळ वा
ट्रेड मध्ये सर्वात तुमचा मोठा शत्रू आसते ती भावना, emotions
बरेच ट्रेडर्स हे त्यांचे analysis
मुळे नाही तर त्यांच्या emotion
मुळे लॉस मध्ये असतात. त्यामुळे यावर चांगली पकड बसवा...
* Portfolio Diversification:
तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये एकच स्टॉक नसू द्या. वेगवेगळ्या सेक्टर चे स्टॉक असू द्या. त्यानुसार तुम्ही तुमच्या रिस्क प्रमाणे यात ट्रेड घ्या. यासाठी support/resistance
विचार करा.
* Set Profit Target or Technical Exit
टारगेट हे तुम्ही ट्रेड घेण्यापूर्वी decide केले होते. पण टेक्निकल एक्झिट चे वेळी moving average विचार करा.
* Limit order
ट्रेड घेताना लिमिट ऑर्डर चां वापर करा. मार्केट ऑर्डर चां नाही. शांतपणे वाट पाहा तो स्टॉक कदाचित तुम्ही कल्पिलेल्या किमतीपेक्षा स्वस्तात मिळेल.
* Trading Diary/Journal
तुमच्या ट्रेडिंग डायरी मध्ये या सर्व गोष्टींचा अभ्यास करा..
** हे टाळा....
* खूपच कमी रकमेचे सुरुवात नको.
* Gambling
* पेनी स्टॉक ची खरेदी टाळा.
*वारंवार ट्रेडिंग स्टाईल बदलू नका.. कधी इंट्रा डे, कधी ऑप्शन, कधी फ्युचर.
* खूप मोठ्या रिटर्न ची अपेक्षा करू नका.
* ओव्हर ट्रेडिंग करू नका.
* ट्रेडिंग प्लॅन सोबत विसंगत राहू नका..
यातील जर वारंवार ट्रेडिंग पद्धत बदलणे, खूप मोठ्या नफ्याची वाट पाहत बसणे...
अशान प्रॉफिट भेटायचा नाही रे..
त्यामुळे वरील नियमाचा विचार अवश्य करा..
साभार:
Swing Trading For Dummies - Omar Bassal
पाटील एकदम भारी
ReplyDeletemst sir
ReplyDelete