कोलकात्याला निघण्याची लगबग, त्यातच सकाळी 7 चे इंडिगोपकडायची घाई. साधारणपणे एक तास अगोदरच विमानतळावर पोहोचणे आवश्यक होते. सिलचर ( आसम ) हवाई तळावर विमान पकडावयाचे असल्यामुळे त्यात वेळ जाणार नव्हता, कारण हातळ हायवे पासून जवळच होता. एक तास अगोदर जाण्याचे कारण म्हणजे विमानात प्रवेशदेण्यापूर्वी सिकीरुटी चेक केला जातो, तो पार पडणे गरजेचे होते.
विमानात बसने हा माझ्यासाठी नवीन अनुभव होता. पहिल्यांदाच विमानात बसणार होतो, त्यामुळे रात्रभर झोप म्हणता झोप काहीयेईना. कधी एकदा हि रात्र संपते, कधी एकदा मी एअरपोर्टला पोहचतो आणि विमानात बसतोअसे झाले होते. विमानात बसल्यावर ते वर जाताना, कसे बरे वाटणार, काय अनुभव येणारह्याची मनाला हुरहूर लागून राहिली होती. वर गेल्यावर खालचे काही दिसत नाही, असेऐकण्यात होते, ते खरे असणार काय? सर्वत्रढगच दिसणार कि आणखी काही दिसणार ह्याबद्दल चिंता लागून राहिली होती. विमान प्रवास तसा थोडक्या अवधीचा म्हणजे फक्त एक तासांचा होता. ह्या एक तासात काय काय घडणार ह्याची मनामध्ये विचारधारा चालू होती.
नेहमी जमिनीवरून आकाशातील उडत असलेले विमान पहात आलो, आणिआज तर मी विमानातून जमीन पाहणार होतो. खरच वरून जमीन दिसेल का, कि फक्त ढगचदिसतील? पायलट हवेतून मार्ग कसा बरे काढेल, ह्याची काळजी होती तशीच मनाजवळहुरहूरही होती. मनामध्ये बालिश प्रश्न उभे राहत होते. त्याला कसे बरे हे कळत असेल कि कोलकात्याला हाच मार्ग बरोबर आहे? खरोखरीच आपण योग्य मार्गाने जावू ना, कि कुठेतरीआकाशात भरकटत राहू, अशी मनाची चलबिचलता चालू होती, घालमेल होत होती. परंतुमनामध्ये एक प्रकारचा आनंदही दाटला होता. ह्या निमित्ताने माझ्यामनातील इतक्या वर्षाच्या शंकांचे निरसनही होणार होते व प्रत्यक्षात हवाई सफारीचाआनंदही लुटता येणार होता.
अशा स्थितीत रात्री झोप कधी लागली ते समजलेच नाही. सकाळचा 3 चा अलार्म लावलेला होताच. त्यामुळे अलार्म वाजताच झोपेतून खडबडून जागा झालोआणि माझी जाण्याची, प्रवासाला निघण्याची लगबग सुरु झाली. कसे बसे एकदाचे सर्वकार्यक्रम भराभर आटोपले आणि भगवंतांचे दर्शन घेवून मार्गस्थ झालो. बरोबर 06 वाजताचएअरपोर्टला हजर झालो. माझ्याबरोबर कोलकात्याला जाण्यासाठी माझा सोबती संजय नागे पण सोबत होता ...
जनार्धन पाटील भुत्ते..
मो-9766738673





Mast aahy ree bhau
ReplyDeleteभाऊ आपले नाव तरी sanag ......जय जिजाऊ
Deleteमी तुकाराम गुटे उंब्रज बोरीकर पाटील हे वाचून अगदी जे माझ्या मनामध्ये होतं तसाच प्रकार होता तुम्ही विमानांमध्ये पहिला बसून पाहिला आणि मी नाही पण वाचून बरं वाटलं खूप छान जय हिंद जय महाराष्ट्र
Deleteखुप छान पाटील...
Deleteजिवन प्रवास एकदम छान सुरुवात झाली आणि आठवणी पण तुम्ही जमा करून ठेवलात देश सेवा करत करत जे आठवणी पण ठेवलात .... आणि सर्वांच्या मनात सर्वात मिसळून कोणत्याही कामात हातभार लावून बॉर्डर वर जरी असले तरी गावाकडील सर्व गोष्टी लक्षात असतात तुमच्या.....
ReplyDeleteसलाम तुमच्या कार्याला.....
.जय जिजाऊ जय शिवराय
जय हिंद जय भारत....
संभाजी वडजे
अंबुलगा कंधार
0+9730605288
मनस्वी tnx भाऊ ..तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मोठे बळ देवो ...जय हिंद जय जिजाऊ .........
DeleteBhau khup bhari rao
ReplyDeleteआभारी आहे मित्रा
DeleteNice janu
ReplyDeletetnx boss
DeleteMast re bgsu
ReplyDeleteMast bhava
ReplyDeleteTNX
Deleteखूप छान पाटील
ReplyDeleteसर्व मित्र परिवाराचे अगदी मन पासून धनवाद ........जय जिजाऊ जय हिंद
ReplyDeleteसर्वांनचे आभारी आहे
ReplyDelete