INDICES & PORTFOLIO
|
WHAT IS NIFTY AND SENSEX?
|
NIFTY
|
NIFTY म्हणजे NSE वर listed असलेल्या टॉप 50 कंपन्यांचा average… NSE [National Stock Of Exchange] वर अनेक कंपन्या list असतात त्यातील market capitalization नुसार ज्या well established कंपन्या असतात त्यांना NIFTY ह्या Index मध्ये स्थान दिलं जातं. त्या 50 कंपन्याच्या वाढण्या आणि कमी होण्यावर NIFTY ची किम्मत अवलंबून असते. एक प्रकारचे average… NIFTYमध्ये विविध क्षेत्रातील (Sector) दिग्गज कंपन्या असतात. ह्या 50 कंपन्याना कायमचे सदस्यत्व नसतं, तर त्या बदलल्या जातात. सामान्यतः विविध क्षेत्रातील कंपण्याचे shares NIFTYत असल्याने हा निर्देशांक कमी किंवा जास्त होणे हे भारतीय अर्थव्यवस्थेशी जोडून पाहिलं जातं. म्हणजे, जर NIFTY वाढत असेल तर विविध sector आणि कंपन्या चांगल्या वाढत आहेत आणि पर्यायाने प्रगती होत आहे असं समजलं जातं. सध्या NIFTY या निर्देशांकाची किम्मत 10000 च्या वर आहे. |
SENSEX
|
SENSEX ज्याप्रकारे NIFTY हा निर्देशांक आहे त्याचप्रकारे SENSEX हासुद्धा एक निर्देशांक आहे. SENSEX अर्थात Sensitive Index वगैरे. याला BSE 30 असेही म्हणतात. BSE [Bombay Stock Of Exchange] मध्ये list असलेल्या अनेक कंपन्यांपैकी financially well established टॉप 30 कंपन्यांचा निर्देशांक म्हणजे SENSEX. या तीस कंपन्यांची निवड त्यांच्या market capitalization, volume वगैरे अशा अनेक parameters वर केली जाते. सध्या SENSEX ची किम्मत 33000 च्या आसपास आहे. |
DIFFERENT INDICES
|
MID CAP
|
ज्याप्रमाणे NIFTY आणि SENSEX हे index आहेत तसेच विविध क्षेत्राचे काही separate Indices आहेत. NIFTY आणि SENSEX मध्ये सर्वच क्षेत्रातील कंपन्या असतात, पण ज्या Index मध्ये फक्त एका क्षेत्राशी संबंधित stocks असतात त्यांना आपण sectorial indices म्हणतो. यात सर्वाधिक Active Index आहे BankNifty. BankNifty मध्ये टॉपच्या Public Sector Banks आणि Private Banks समाविष्ट केलेल्या असतात. त्यानंतर Nifty PSU Bank या Index मध्ये विविध Public Sector Banks समाविष्ट असतात तर Nifty Private Bank या Index मध्ये Private Banks असतात. Nifty Pharma हा Index विविध pharma shares साठी आहे. उदाहरणार्थ Sunpharma, Ajanta Pharma, Cipla Nifty IT यात टॉपच्या IT कंपन्या असतात. उदाहरणार्थ, Infosys, TCS, KPIT Technology जशी NIFTY आणि SENSEX ची किम्मत ठरली जाते तशीच या Indices ची किम्मत ठरते. पण ह्या Indices मध्ये सरसकट त्या-त्या क्षेत्रातील सर्वच कंपन्या असतात असं नाही. Large Cap, Midcap अशा दर्जेदार कंपन्या त्या Sector Index मध्ये List असतात. कोणत्या कंपन्या INDEX मध्ये INCLUDE करायच्या यासाठी काही निकष असतात. असे विविध Index आहेत. |
SMALL CAP, MID CAP & LARGE CAP Market Capitalization
|
SMALL CAP
|
कंपनीचे Market Capitalization 1 Billion कोटींपेक्षा कमी असेल तर त्याला Small Cap म्हणतात. ज्या कंपन्या सुरुवातीच्या पायरीवर असतात त्या small cap मध्ये गणल्या जातात. या stocks मध्ये बरीच volatility असते. कमी capital असल्याने यांच्या वाढण्याचा अन घसरण्याचा वेग बराच असतो. उदाहरणार्थ – HDIL, Welspun, Just Dial |
MID CAP
|
कंपनीचे market capitalization जर 2B ते 10B कोटी असेल तर त्याला Mid Cap म्हणतात. या कंपन्यांचं कॅपिटल हे कमीही नसतं आणि Large Cap इतकं जास्तही नसतं, पण त्यांच्यात क्षमता असते Large Cap बनण्याची. उदाहरणार्थ – Ashok Leyland, Bata, CG India, Bank Of India |
LARGE CAP
|
ज्या कंपन्यांचे market cap HUGE असतं त्यांना Large Cap म्हणतात. सर्व Large Cap ह्या सुरुवातीपासून Large Cap नसतात, तर काही Small Cap ते Mid Cap असा प्रवास करून आलेल्या असतात. उदाहरणार्थ, Large Cap – TCS, Maruti Suzuki, ITC |
UPPER CIRCUIT & LOWER CIRCUIT
|
बाजारात एखाद्या वस्तूला खूप मागणी असते याचा अर्थ त्या वस्तुला खरेदी करणारे (Buyers) खूप असतात. Buyers जास्त म्हणजे त्या वस्तूची किम्मत वाढते आणि विक्री करणारा स्वतःला हव्या त्या किमतीला ती वस्तु विकायला उत्सुक असतो. पण बर्यााचदा असं होतं की Demand अर्थात मागणी खूप असली तरी विकायला विक्रेते नसतात; अर्थात Demand (Buyers) आहे पण पुरवठा (Supply) करणारे विक्रेते नाहीत. हा एककल्ली व्यवहार होऊ लागतो. युद्धाच्या किंवा आणीबाणीच्या प्रसंगी अन्नवस्तूंची किम्मत वाढते आणि स्वतःकडे असलेला कोठार कोणीही विकायला तयार नसतो त्याप्रमाणे. Share बाजारातही अशी परिस्थिती निर्माण होत असते. म्हणजे, बाजारासाठी खूप सकारात्मक (आर्थिक पॅकेज, निवडणूक निकाल, स्थिर सरकार इत्यादि) बातमी असेल तर सगळे लोक shares ची खरेदी करत सुटतात अन विकायला कोणी तयार नसतं. अशा One Side Movement मुळे एखादा share किंवा संपूर्ण बाजार अर्थात Nifty, Sensex सारखे Indices सरसकट वाढू लागतात. अशा तीव्र वाढीची परिस्थितीत SEBI ने (ती संस्था जी share बाजारावर देखरेख अन नियंत्रण करते) घालून दिलेल्या नियमांनुसार NSE/BSE सारखे exchanges त्या share किंवा Index ची trading काही काळ थांबवते... म्हणजे, काही काळ trading अर्थात खरेदी-विक्री बंद केली जाते. या अशा परिस्थितीला upper circuit (वरचा अटकाव) म्हणतात. साधारणतः निर्देशांक (Index) किंवा share 10%, 15% , 20% पेक्षा अधिकची वाढ सलग काही trading sessions नोंदवत असेल तर हा Upper Circuit लावला जातो. ही टक्केवारी share आणि Index नुसार बदलू शकते. याचे नियम SEBI ने तयार केलेले असतात अन Exchanges त्याची अमलबजावणी करत असतात. त्यामुळे Upper/lower Circuit लावताना विविध परिमानांचा विचार केला जातो. बाजारात याउलटही स्थिती असू शकते. ती म्हणजे,जर खूप नकारात्मक (भूकंप, राष्ट्रीय आपत्ती, राजकीय घडामोड) घटना घडली तर गुंतवणूकदार आपला पैसा बाहेर काढून घेऊ बघतात, कोणीही shares खरेदी करायला तयार नसतं, सर्वाच्या सर्व विकणारे (Only Sellers) असतात तेंव्हा share किंवा निर्देशांक कोसळू लागतो. अशा परिस्थितीत बाजारावर देखरेख अन नियंत्रण करणार्याक संस्था ट्रेडिंग, अर्थात खरेदी-विक्री प्रक्रिया काही काळ बंद ठेवते.... याला Lower Circuit म्हणतात. Upper Circuit किंवा Lower Circuit वैयक्तिक share ला किंवा Nifty किंवा Sensex सारख्या Index ला लागू असतं. याला circuit filters म्हणतात. अस्थिरतेवर मर्यादा असावी म्हणून SEBI ने हे नियम केलेले असतात. Share किंवा Index दिवसात कमाल व किमान किती वाढू किंवा कोसळू शकतो याला मर्यादा असतात. ही मर्यादा व त्याची टक्केवारी SEBI बदलू शकते. यासाठीही काही गणितं आणि ठोकताळे असतात. |
आपल्या Order काय होतात...?
|
Upper किंवा Lower circuit लागू झाल्याच्या नंतर order टाकता येत नाही. जेंव्हा परत व्यवहार सुरू होतील तेंव्हा orders परत टाकता येतील. पण तुम्ही आधीच टाकून ठेवलेल्या orders pending राहतात. हेतु - असे Circuit लावण्याचा हेतु असा असतो की, खरेदीकर्ते किंवा विक्रीकर्ते कमी होतील. काही सकारात्मक/नकारात्मक न्यूजमुळे गुंतवणूकदार आणि traders सेंटिमेंट ने विचार करून खरेदी-विक्री करत सुटतात. दरम्यानच्या काळात ही मानसिकता कमी होऊन सुरळीत व्यवहार व्हावेत यासाठी circuit लावतात. Upper Circuit लागू होणं एकप्रकारे चांगलं असतं, कारण त्यामुळे बाजारात तेजी अन नवचैतन्य येण्याची चिन्हं असतात. तुम्ही गुंतवणूक केलेल्या share ला जर Upper Circuit लागू झालं असेल तर ती चांगली गोष्ट आहे कारण त्यामुळे त्याची किम्मत वाढती राहून तुम्ही नफ्यात राहता. निर्देशांकना (Nifty &Sensex) Lower Circuit हे अर्थव्यवस्था व गुंतवणुकीसाठी धोक्याची घंटा समजलं जातं. हे बाजारात नकारात्मक बाजूला घेऊन जात असतं. यात अनेक गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावं लागतं अन पैसे अडकून राहण्याची शक्यता असते. PRICE BAND म्हणजे SEBI ने घालून दिलेली ती Range ज्यामध्ये तो share दिवसभरात कार्यरत राहू शकतो. अर्थात, Upper Circuit आणि Lower Circuit मधील ही range. |
WHAT IS A PORTFOLIO?
|
वर म्हंटल्याप्रमाणे, share बाजारात विविध क्षेत्रातील sector चे shares असतात. दूसरा भाग म्हणजे प्रत्येकाची shares मधील गुंतवणुकीचा हेतु वेगळा असू शकतो. ज्यांना Long Term Investment करायची असते, भविष्यात जेंव्हा गरज आहे तेंव्हा गुंतवलेल्या रकमेचा योग्य परतावा मिळावा अशी अपेक्षा असते ते पैसे गुंतवत असताना योग्य व balanced portfolio तयार करतात. गुंतवणूकदाराने भविष्याची तरतूद करत असताना वेगवेगळ्या sectors मधील योग्य shares खरेदी करून ठेवणे व त्यातून जी long term गुंतवणूक तयार होते त्याला Portfolio म्हणतात. माझ्या Demat वर जे काही shares आहेत तो माझा share portfolio. मी जर आज पाच लाख गुंतवणूक करणार असेन आणि पाच वर्षांच्या नंतर मला त्याचा योग्य परतावा पाहिजे असेल तर मला आज विविध क्षेत्रातील चांगल्या दर्जाचे, वाढ होतील असे shares घ्यावे लागतील. कारण पाच वर्षांच्या नंतर आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थिती कशी असेल हे आत्ता सांगता येत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर आज pharma sector विविध अडचणींमुळे योग्य वाढ करत नाहीये, जागतिक कारणांमुळे IT Sector ही मंदीचा सामना करत आहे; पण आज Metal Sector (Tata Steel इत्यादी) किंवा Auto Sector किंवा banking sector चांगल्या स्थितीत आहे. पाच वर्षानी कदाचित यातील काही सेक्टर योग्य स्थितीत असतील तर काही मंदीचा सामना करत असतील. ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन आपण आज जी Distributed, Diversified व balanced गुंतवणूक करत आहोत त्याला Portfolio Management म्हणतात. जर सर्वच्या सर्व रकमेची गुंतवणूक एक-दोन कंपन्यांत केली अन काही कारणाने जर आपल्याला हवे असतील तेंव्हा ते shares किंवा sector अडचणीत असेल तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचा योग्य परतावा मिळणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करताना ती विचारपूर्वक करावी आणि योग्य portfolio तयार करावा. वर दिलेल्या टेबलमध्ये सात वेगवेगळे sectors अन त्या sectors मधील टॉप कंपन्यांची यादी अन वेगवेगळ्या काळातील त्यांची किम्मत किती होती याची माहिती दिली आहे. November 2012 ते January 2017 आणि आज त्या share ची किम्मत कशी कमी जास्त होते ते दर्शवले आहे. यात एक बाब लक्षात ठेवली पाहिजे की दरम्यानच्या काळात त्या कंपनीने Dividend, Bonus, Split यासारख्या Corporate Actions ही घडल्या असू शकतात. याची माहिती पुढे घेऊ. पण ढोबळमानाने या किमती आपण ग्राह्य धरू शकतो. नोवेंबर 2012 मध्ये जर मी सातही कंपन्यांचे प्रत्येकी 1 असे shares खरेदी केले असते तर त्यांची वेगवेगळ्या कालावधीत किम्मत किती असू शकते हे त्या टेबलमध्ये कळेल. म्हणजे मी जर माझी एकत्रित गुंतवणूक कधीही काढू इच्छित असतो तरी मला नफाच मिळाला असता. मूळ गुंतवणुकीच्या चांगला परतावा. याउलट, जर मी फक्त SBIमध्ये 220 या रेटने सर्वच पैसे गुंतवले असते आणि जानेवरी 2017 ला ती गुंतवणूक संपवली असती तर मला खूप कमी परतावा मिळाला असता. कारण जानेवरी 17 मध्ये बँकिंग सेक्टर किंवा SBI चा share काही कारणास्तव वाढ करू शकत नव्हता. किंवा Sunpharmaमध्ये जर मी एप्रिल 2015 ला गुंतवणूक केली असती तर आजच्या रेटनुसार मी नुकसानीत असतो. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की गुंतवणूक करताना विशिष्ट नियोजन आणि त्यातील माहिती असायला हवी. सरळसोट कुठलेही shares घेऊन ठेवणे हे योग्य गुंतवणुकीचे लक्षण नाही. कंपनीचा Share जरी चांगला असला तरी तो सदासर्वकाळ वाढतच राहील असं नसतं. विविध कारणास्तव त्या सेक्टर किंवा त्या share मध्ये पडझड होत असते. गुंतवणुकीचा काळ, गुंतवणुकीची अमाऊंट, चालू आर्थिक परिस्थिती अन भविष्यातील बाबींचा विचार करून shares निवडणे, त्यात परिस्थितीनुसार बदल करणे, एकंदर रणनीती ठरवणे याला Portfolio Management म्हणतात, आणि त्या shares ची गोळाबेरीज म्हणजे योग्य portfolio. साधं उदाहरण द्यायचं झालं तर, गावाला जाताना आपण सर्वच्या सर्व रक्कम एकाच ठिकाणी ठेवत नाहीत. कारण ती चोरीला गेली किंवा काही गफलत झाली तर आपण अडचणीत येऊ शकतो. त्यासाठी आपण आपले पैसे पाकिटात, बॅगेत असं विविध ठिकाणी ठेवतो जेणेकरून एका ठिकाणची रक्कम जरी चोरीला गेली तरी दुसर्याि ठिकाणची रक्कम आपल्याला उपयोगी पडते. ठळकपणे वर दिलेल्या टेबलमध्ये वेगवेगळ्या सेक्टरमधील फक्त टॉप कंपन्या घेतल्या आहेत. त्या सेक्टरमध्ये अजूनही उत्तमोत्तम कंपन्या असू शकतात. यात तुम्ही एखादी छोटी पण भविष्यात चांगला परतावा देऊ शकण्याची अपेक्षा असणारी कंपनीही जोडू शकता. उदाहरण द्यायचं झालं तर Auto Sector मधील Ashok Leyland हा share July 2014 ला 30 रुपये होता ज्याची October 2017 मध्ये किम्मत 120 रुपये आहे. अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्यात चांगला परतावा देण्याची क्षमता असते. ते shares आपण आपल्या portfolio मध्ये अॅड करू शकतो. |
A MIDCAP & SMALLCAP PORTFOLIO
|
GLOBAL INDICES
|
GLOBAL INDICES
|
ज्याप्रमाणे आपल्याकडे NIFTY, SENSEX हे Market Indicaters आहेत तसेच प्रत्येक देशाचे असतात. भारतीय बाजारात परदेशी खरेदी-विक्री करू शकतात आणि भारतीय सुद्धा परदेशी बाजारात खरेदी-विक्री करू शकतात. अर्थात यासाठी नियम-अटी असतात. सामान्यपणे जगभरातील घडामोडींचा भारतीय share बाजारावर परिणाम होत असतो. जागतिकीकरण व परराष्ट्रव्यवहार यामुळे जगातील सर्व अर्थव्यवस्था आणि पर्यायाने share बाजार एकमेकांवर अवलंबून असतात.
|


No comments:
Post a Comment