शेयर मार्केट भाग -3







बेसिक माहिती..... 

FACE VALUE / PAR VALUE

Face value is defined as "the nominal value or dollar value of a security stated by the issuer." It is determined by the nominal value of the security, stock or bond upon issuance. Generally, face value is determined using the company's balance sheets and the projected real costs for growth within the company. बाजारातील share ची किम्मत म्हणजे Actual Value असते आणि Face Value ही कंपनीचे बाजारमूल्य, भांडवल आणि balance sheets यावरून Face Value नुसार निश्चित होत असते. साधारणपणे 1, 2, 5 आणि 10 अशी ती face value असते.
VOLUME OF SHARE

Total Number or amount Of shares traded in a particular period. The number of shares or contracts traded in a security or an entire market during a given period of time. एखाद्या share मधील एकंदरीत खरेदी-विक्री करणार्यां ची संख्या असं आपण ढोबळमानाने म्हणू शकतो. जर ABC share मध्ये 500 buyers आहेत आणि 200 sellers आहेत तर, 500 + 200 = 700 ही त्या share ची आत्ताची volume म्हणता येईल. ती केंव्हाही कमी-जास्त होऊ शकते कारण कोणताही गुंतवणूकदार कधीही खरेदी-विक्री करू शकतो. उदाहरणार्थ, ABC कंपनीबद्दल जर काही सकारात्मक बातमी आली तर त्यात अचानक Buyers वाढू शकतात आणि पर्यायाने volume ही वाढते. जर Volume जास्त असेल तर त्या share मध्ये volatility ही जास्त असू शकते. जर एखाद्या कंपनीचे त्रैमासिक निकाल असतील किंवा अन्य कारण असेल तर त्या कंपनीच्या share मध्ये volume जास्त असते. कारण त्या कंपनीच्या एकंदरीत निकालाला, बातमीला अनुसरून गुंतवणूकदार त्याचं मूल्यांकन करून त्याला खरेदी किंवा विक्री करू शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर RBI Policy!! कारण RBI Policy च्या दिवशी Banking shares मध्ये चांगलं volume असतं. साधारणपणे, Volume ही Intraday traders साठी अत्यंत महत्वाची असते. कारण खरेदी-विक्री जास्त असेल तर त्यात volatility जास्त येऊन त्या share ची किम्मत खाली-वर होऊन त्यात नफ्याची संधि जास्त असते. जर stock च volume कमी असेल तर त्यात फार उतार-चढाव नसतो आणि नफ्याची संधी कमी असते. म्हणजे खरेदी करणारे 100 आहेत आणि विक्री करणारे 150 तर त्या stock च्या किमतीत फार वाढ किंवा तूट होणार नाही. पण तेच जर 5000 buyers आहेत अन 2000 sellers आहेत तर हे उघड आहे की त्याच्या किमतीत फार फरक पडू शकतो. मी जर एखाद्या कंपनीचा एकच share 5 रुपयांना खरेदी करून 10 रुपयाला विकला तर माझा नफा फक्त 5 रुपये असेल. पण त्याचजागी, जर मी 100 shares 5 रुपयाला घेऊन 10 रुपयाला विकले तर माझा नफा 500 रुपये असेल. Volume चही असच असतं. जर समझा ABC stock मध्ये 1000 buyers आहेत आणि sellers नाहीतच. म्हणजे 1000 ही त्याची volume. तर ज्याने खरेदी केले आहेत त्याला sell करताना अडचण येऊ शकते. कारण जर अजून गुंतवणूकदार त्यात खरेदी-विक्री करत नसतील तर त्या stock च्या किमतीत बदल होणारच नाही, आणि खरेदी करणार्यायला अपेक्षित नफा न मिळाल्याने तो विकणारही नाही. त्यामुळे share चं High Volume असणं हे एकंदरीत गुंतवणूकदाराच्या फायद्याचं ठरतं, कारण High Volume gives liquidity. आता liquidity काय हे नंतर बघूच.
VOLATILITY

Volatility म्हणजे अस्थिरता. Share बाजारातील याचा अर्थ असा की, एखाद्या share चा किंवा निर्देशांकाचा भाव स्थिर नसणे. तो कमी वेळात वेगाने चढता किंवा उतरती किमतीला जाणे म्हणजे volatility. Volatility कमी असणे म्हणजे त्या stock किंवा Index (NIFTY वगैरे) मध्ये जास्त fluctuation नसणे. कमी Volatility म्हणजे Intraday traders ला नफा कमवण्याची संधी जास्त नसते. Volatility जास्त आहे म्हणजे त्या stock/Index ला खरेदी किंवा विक्री करणार्यांyची संख्या मोठी असल्याने त्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात आणि वेगाने बदल होत असतो. अशाने Intraday Traders ला नफा कमवण्याच्या अधिक संधी असतात. मोठी राजकीय घडामोड, केंद्रीय अर्थसंकल्प, RBI Policy, राष्ट्रीय आपत्ती, आंतरराष्ट्रीय घडामोड यामुळे बाजार हे Volatile असतात. आणि particular share च्या बाबतीत सांगायचं झालं तर, कंपनीच्या Quarterly Results, काही घोषणा किंवा बातमीमुळे त्या कंपनीचे share volatile असतात. नुकतच झालेली घडामोड म्हणजे, Infosys कंपनीचे CEO विशाल सिक्का यांनी पदाचा राजीनामा दिल्याच्या नंतर Infosys चा volatile झाला होता अन कोसळला होता. Volatility measure करण्याचे काही विशिष्ट parameters असतात आणि त्यावरून underlying asset (share किंवा Index) ची expected value काढता येते. Volatile market साठी volume कारणीभूत असतं आणि अति volatility upper किंवा lower circuit ला कारणीभूत ठरतं.
INTRADAY TRADING

या प्रकारात तुम्ही एखाद्या कंपनीचा share आजच खरेदी करता अन आजच विकता. भारतीय Share बाजार सकाळी 9.15 ला सुरू होतो अन दुपारी 3.30 ला बंद होतो. ह्या एकदिवसीय कालावधीत जर share खरेदी केला अन विकूनही टाकला तर त्याला Intraday Trading म्हणतात. असं करण्याचे काही फायदेही आहेत अन तोटेही. पण Intraday Trading करण्यामागे कमी कालावधीत जास्त पैसे मिळवणे हा हेतु असतो. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीबद्दल काही सकारात्मक बातमी असेल किंवा त्या कंपनीचे आज चांगले त्रैमासिक निकाल (Quarterly Results) अपेक्षित असतील तर सकाळी तो share जास्त quantity ने खरेदी करायचा अन चांगला परतावा मिळताच त्याच दिवसात विकून टाकायचा. फायदे- कमी कालावधीतं चांगल्या परतव्याची शक्यता असते. Intraday trading करण्यासाठी ब्रोकर किंवा कंपनी तुम्हाला margin (साध्या भाषेत उधारी) देते ज्यात तुम्ही 100 रुपये असतांनाही 1000 रुपयांपर्यंत खरेदी-विक्री करू शकता. पण अट अशी असते की तो trade तुम्हाला त्याच दिवशी संपवावा लागतो. Intraday Trading साठी brokerage कमी आकारलं जातं. साधारणपणे traded value 0.1% असतं जे खरेदी अन विक्री करताना द्यावं लागतं. तोटे- यामध्ये रिस्क अधिक आहे. दिवसातला पूर्णवेळ (trade पूर्ण होईपर्यंत) तुम्हाला यावर खर्च करावा लागेल. कारण त्या share ची किम्मत कमी-जास्त होत असते अन योग्य दर येताच तुम्हाला तो विकावा लागतो.
DIVIDEND

साध्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर कंपनीकडून त्यांच्या भागधारकांना अर्थात shareholders ना (ज्यांच्याकडे त्या कंपनीचे shares आहेत ते) काही रक्कम दिली जाते त्याला dividendम्हणतात. ही रक्कम फार जास्त नसते आणि प्रत्येक shareच्या मागे दिली जाते.बँकेत ठेवलेल्या रकमेवर ज्याप्रकारे व्याज मिळतं त्याप्रमाणे! तुम्ही जर एखाद्या कंपनीचे shareholder असाल अन ती कंपनी जर नफा कमावत असेल तर तुमच्या shareholding नुसार त्या नफ्यातीलकाही रक्कम कंपनी देते. Dividend ची मिळणारी रक्कम ही tax free असते आणि त्यावर कसलाही brokerage लागत नाही. ही रक्कम तुमच्या Demat खात्याला link असलेल्या savings खात्यात जमा होते. Dividend हा सामान्यतः QuarterlyResults (त्रैमासिक निकाल) दरम्यान जाहिर करतात. यात Interim dividend [अंतरिम लाभांश]आणि Final dividend [अंतिम लाभांश]असे दोन प्रकार आहेत. INTERIM DIVIDEND हा Quarterly Results किंवा Semi-Annual Results च्या दरम्यान दिला जातो. [[[एका आर्थिक वर्षात कंपनीला तीन महिन्याला एकदा याप्रकारे वर्षातून चार वेळा कंपनीचे निकाल जाहीर करावे लागतात. त्यापैकी March महिन्यातील निकाल हा Final अर्थात Annual Result अर्थात वार्षिक निकाल असतो तर September चे निकाल हे Semi-Annual असतात.]]] Interim Dividend हे कंपनीचा वार्षिक नफा,उत्पन्न इत्यादी निर्धारित होण्याची आधी दिला जातो.Interim Dividend हा Board Of Directors जाहीर करतात अन shareholder च्या approval मंजूरीद्वारे होतो. FINAL DIVIDEND हे कंपांनीच्या वार्षिक निकालाच्या (Final Results in March) वेळेस दिला जातो. कंपनीचा वार्षिक नफा, उत्पन्न, खर्च इत्यादी बाबी स्पष्ट झालेल्या असतात त्यानुसार हा Dividend दिला जातो.Final Dividend हा कंपांनीच्या AGM (Annual General Meeting) मध्ये मंजूर केला जातो. कंपनीचे Quarterly Results जेंव्हा जाहीर होतात तेंव्हा dividend ची घोषणा होते आणि तो केंव्हा मिळेल याचीही तारीख दिली जाते. त्यात Record Date आणि Effective Date या महत्वाच्या असतात.या Record Date आणि Effective Date नुसारच dividend चे लाभार्थी (अर्थात जे dividend मिळण्यास पात्र आहेत असे shareholders)ठरतात. Infosys, TCS, SBI, Coal India, Tata Steel, Maruti Suzukiसारख्या कंपन्या चांगला dividend देतात. त्यामुळे अशा shares मध्ये long term ची गुंतवणूक ही फायदेशीर ठरते. समजा, XYZ कंपनीने 10 रुपये dividend दिला आहे आणि 20 Nov ही त्याची Record Date आहे, तर 20 Nov ला त्या share चा भाव 10 रुपये कमी ने सुरू होतो. नंतर buyers आणि sellers आल्याच्या नंतर नेहमीच्या व्यवहाराप्रमाणे त्याची किम्मत कमी जास्त होत असते.
DIVIDEND YIELD

हा एक Financial Ratio आहे जो असं निर्देशित करतो की प्रत्येक कंपनी त्याच्या शेअर मूल्यानुसार प्रत्येक वर्षी किती dividend देते. Dividend yield calculate करण्यासाठी कंपनीने दिलेला वार्षिक dividend ला त्या कंपनीच्या share price ने divide करावे लागेल. समजा, XYZ कंपनीचा share price आहे 50 आणि वार्षिक dividend आहे 1 रुपये. सूत्रानुसार, 1/50=0.02 इतका dividend yield येईल आणि टक्केवारीच्या दृष्टीने तो 2% इतका असेल. Dividend yield जास्त असणे हे गुंतवणूकदारच्या दृष्टीने चांगलं असतं. मुळात Dividend हा कंपांनीच्या नफ्यातून दिला जातो, नफा जास्त म्हणजे dividend जास्त. ABC ही कंपनीचा share price आहे 100 आणि dividend pay केला आहे 1 रुपये. तसेच PQR ह्या कंपनीचा share price आहे 200 आणि dividend pay केला आहे 1 रुपये. यात ABC चा dividend yield आहे 1/100=0.01 म्हणजेच 1% आणि PQR चा dividend yield आहे 1/200=0.005 म्हणजेच 0.5% त्यामुळे ABC ही कंपनी चांगला नफा कमावत आहे अन त्याचा लाभांश गुंतवणूकदारांना देत आहे असा होतो.
BONUS

साधारण भाषेत किंवा रोजच्या जीवनात बोनस म्हणजे नेहमीच्या पगारापेक्षा कंपनी अधिकचं काहीतरी देते त्याला बोनस म्हणतो. म्हणजे दिवाळीत बोनस दिला वगैरे... Share बाजारातही Bonus संकल्पना अशाच पद्धतीने वापरला जातो. तुमच्याकडे असलेल्या shares च्या आधारावर कंपनी अधिकाचे shares देऊ करते तेंव्हा त्याला Bonus Shares म्हणतात. म्हणजे XYZ कंपनी आपल्या सर्व भागधारकांना / shareholders ना एकावर एक share फ्री देत असेल तर त्याला 1:1 (One As To One) Bonus म्हणतात. हे प्रमाण वेगवेगळ असू शकतं, म्हणजे 1:2 किंवा 1:5 किंवा 1:10 असं असेल तर प्रत्येकी दोन share ला एक share मोफत, भागधारकाच्या प्रत्येकी पाच share मागे एक share मोफत, प्रत्येकी दहा share ला एक share मोफत असं ते प्रमाण असू शकतं. पण जेंव्हा कंपनी Bonus देते तेंव्हा त्या share ची किम्मत बाजारात त्या प्रमाणात कमी होत असते. उदाहरणार्थ, जर XYZ कंपनीने 1:1 म्हणजे एकास एक प्रमाणात Bonus दिला असेल अन Bonus पूर्वी त्या share ची किम्मत 120 असेल तर bonus नंतर त्याची किम्मत 60 रुपये होते. हेच प्रमाण जर 1:2 असं असेल तर 120 ची किम्मत [120 * 2 / 3 या सूत्रांनुसार] ती किम्मत bonus नंतर 80 रुपये होते. याचा अर्थ असा की गुंतवणूकदाराचे मूल्य तेवढच राहतं; shares ची किम्मत कमी होते अन संख्या वाढते. Increased Quantity reduced price. हेतु – यामुळे कंपनीचे बाजारातील shares वाढतात आणि retail investor कडे त्याची संख्या वाढते. कंपनीच्या share ची किम्मत जर जास्त असेल आणि सामान्य गुंतवणूकदाराला जर ती किम्मत गुंतवणूक करण्यास मोठी वाटत असेल तर अशा परिस्थितीत त्याची किम्मत कमी करण्यासाठी Bonus चा मार्ग असतो, जेणेकरून त्या share ची किम्मत कमी होईल अन सामान्य गुंतवणूकदारास ती गुंतवणूक करण्यास आकर्षक वाटेल. शिवाय, बाजारातील shares वाढल्याने dividend ही कमी द्यावा लागतो. Infosys कंपनीने 2014 आणि 2015 साली 1:1 असा बोनस दिला होता. यामुळे share price 2014 साली 4000 वरुन 2000 आणि मग 2015 साली 1000 असं झालं. Bonus दिल्याने कंपांनीच्या बाजारातील shares ची संख्या वाढते अन किम्मत कमी होते, यामुळे त्या कंपांनीच्या भांडवल,Face Value किंवा बाजारातील क्षमता यात फरक पडत नाही. ज्याप्रमाणे Dividend साठी Record Date आणि Effective Date असतात त्याप्रमाणे त्या Bonus साठीही असतात. http://www.yourarticlelibrary.com/accounting/bonus-shares-accounting/bonus-shares-meaning-effects-and-advantages/70726
SPLIT

Stock Split चा निर्णय हा Board Of Director हे कंपांनीच्या AGM मध्ये घेतात. याचा हेतुही Bonus सारखाच आहे. कंपनीचे बाजारातील shares ची संख्या वाढावी आणि किम्मत कमी करून नवीन गुंतवणूकदारांना आकर्षित करता यावं हा त्यामागचा मूळ हेतु. यामध्येही सध्याच्या भागधारकांना अतिरिक्त shares दिले जातात पण त्या share ची बाजारातील किम्मत कमी केली जाते. यात मुख्य फरक असा की stock split झाल्यानंतर त्याच्या Face Value मध्ये बदल होतो. म्हणजे एखाद्या share ची Face Value 10 रुपये असेल तर त्याची Face Value 10 वरुन 5 केली तर एका share चे दोन share होतात; जर ती 2 रुपये केली तर एका share चे पाच shares होतात आणि Face Value दहाची एककेली तर एकाचे दहा shares होतात. जेंव्हा कंपनीकडे cash reserves जास्त असतात आणि dividend ratio हाताळणे अवघड होते तेंव्हा कंपनी Bonus देते आणि Share Split नंतर EPS [Earning Per Share]सुद्धा त्याच प्रमाणात कमी होतो.
RIGHT ISSUE

A rights offering (issue) is an issue of rights to a company's existing shareholders that entitles them to buy additional shares directly from the company in proportion to their existing holdings, within a fixed time period. म्हणजे, जर तुमच्याकडे एखाद्या कंपनीचे shares आहेत तर त्या आधारावर कंपनी तुम्हाला एका ठराविक कालावधीत, ठराविक किमतीने अजून काही shares देऊ करते. हे shares थेट कंपनीकडून offer केले जातात अन तुम्ही त्या कंपनीचे shareholder असल्याने तुम्हाला अजून kahi shares मिळू शकतात. तुम्हाला किती shares मिळणार हे तुमच्याकडे त्या कंपनीचे किती shares आहेत या प्रमाणावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ, जर कंपनीने Right Issue च प्रमाण 1:5 (पाचास एक) असं ठरवलं असेल तर तुमच्याकडील प्रत्येकी पाच shares साठी एक share कंपनी देऊ करते. म्हणजे, तुमच्याकडे जर ABC कंपनीचे 200 shares आहेत आणि कंपनीने 1:5 हे प्रमाण ठरवलं आहे तर तुम्हाला ती कंपनी 40 shares ठराविक (जी सामान्यतः त्या share च्या बाजारातील किमतीपेक्षा कमी असते) देऊ करते, जे घ्यायचे का नाही याचा अधिकार shareholder ला असतो. कंपनीचा हेतु – कंपनी Right Issue देताना सामान्यतः discount rate ने देत असल्याने shareholders ते खरेदी करण्यास उत्सुक असू शकतात जेणेकरून कंपनीचे बाजारातील shares तर वाढणारच आहेत शिवाय कंपनीला या प्रक्रियेतून नवीन भांडवल मिळण्याची शक्यताही असते.
BUYBACK

ही प्रक्रिया Right Issue च्या थोडीशी उलटी आहे. जेंव्हा कंपनी बाजारातून अर्थात, सामान्य shareholder कडून कंपनीचे shares परत विकत घेते याला BuyBack म्हणतात. एखाद्या कंपनीने जर ठराविक rate ला shares buyback ची तर forms submit करून सामान्य shareholder आपल्याकडील shares कंपनीला परत करू शकतो. Buyback चे दर हे सामान्यतः बाजार दरांपेक्षा जास्त असतात जेणेकरून सामान्य गुंतवणूकदार अधिक नफ्याच्या आशेने shares कंपनीला परत करेल. Right Issue हा shareholder कडील उपलब्ध असलेल्या shares च्या प्रमाणात असतो; पण Buyback हा थोडासा वेगळा भाग आहे. यात तुम्ही किती shares देऊ शकता ते कंपनी ताब्यात घेते; असे apply करणार्याि अनेकांचे shares कंपनी आधी ताब्यात घेते अन नंतर किती कोणाचे किती shares परत घेणार हे ठरवलं जातं. लॉटरी पद्धतींने!
IPO (INITIAL PUBLIC OFFER)

जेंव्हा एखादी अस्तीत्वात असलेली कंपनी share बाजारात नव्याने उतरत असते, ज्या प्रक्रियेतून त्या कंपनीला भांडवल निर्मिती करता येते, तेंव्हा SEBI च्या परवानगीने Stock Exchange मध्ये list होत असते. IPO मुळे सामान्य गुंतवणूकदार थेट कंपनीकडून Shares विकत घेतल्याने कंपनीला नवीन भांडवल मिळतं. सामान्य गुंतवणूकदारांना त्यात सहभाग घेता यावा अन त्या कंपनीचे shares घेऊन कंपनीत भागधारक होता यावे यासाठी ती प्रक्रिया असते. या प्रक्रियेला IPO - Initial Public Offering प्रक्रिया म्हणतात. यात कंपनीला स्वतःची सर्व माहिती जाहीर करावी लागते. या प्रक्रियेत Share चा दर ठरवलेला असतो, Lot Size (अर्थात एका गुंतवणूकदाराला किमान किती shares घ्यावे लागतात – 20, 30, 50 असे lot size असतात) असते. एका IPO ची किम्मत ही साधारणपणे 15000 च्या आसपास असते. सामान्य गुंतवणूकदाराला कितीही Lot साठी apply करता येतं, पण शक्यतो एकच Lot Allocate केला जातो. IPO तून shares घ्यायचे असतील तर ते तुम्हाला ब्रोकरच्या माध्यमातून Apply करता येतं किंवा तुमच्या Demat ला लिंक असलेल्या savings बँक खात्याच्या OnlineBanking वापरुन तुम्हाला Apply करता येतं. पण त्या खात्याला ASBA ही सुविधा उपलब्ध असायला हवी. सर्वात महत्वाचं म्हणजे, तुम्ही IPO ला apply केलं आहे म्हणजे तुम्हाला ते shares मिळतीलच असे नसतं. ही प्रक्रिया लॉटरी पद्धतीने पार पाडली जाते. समजा, PQR कंपनी आहे. ती कंपनी भांडवल उभं करण्यासाठी बाजारात shares घेऊन येते. समजा कंपनी 500 कोटींचे भांडवल उभं करण्यासाठी 1 लाख shares बाजारात आणत आहे. कंपनी दर्जेदार असेल तर अनेक गुंतवणूकदार कंपनीत गुंतवणूक करू बघतात. समजा 2 लाख गुंतवणूकदारांनी त्या IPO प्रक्रियेत सहभाग घेतला असेल. Shares 1 लाख आणि त्यासाठी 2 लाख लोक apply करत आहेत म्हणजे सर्वांना ते shares मिळणार नाहीत. मग लॉटरी पद्धतीने गुंतवणूकदारांना shares allocate केले जातात. इथे मागणी जास्त आहे आणि shares कमी, म्हणजे IPO तून दिल्या जाणारे shares ची किम्मत वाढू शकते. ह्या सर्व प्रक्रियेसाठि तारखा निश्चित केलेल्या असतात. कोणते IPO चांगले, कोणत्या IPO साठी apply करावं हा निर्णय विचार करून घ्यावा लागतो. यासंबंधित माहिती टीव्ही चॅनल वर किंवा विविध वेबसाइटवर मिळेल. IPO या विषयावर बराच खल करता येईल. त्यासाठी वेगळं लिखाण करुयात... http://latenightedition.in/wp/?p=2685
RECORD DATE & EFFECTIVE DATE

Record Date ही “cut off” date असते ज्याद्वारे dividend, bonus इत्यादीसाठी shareholders (लाभार्थी) पात्र आहेत की नाहीत हे ठरवलं जातं. Record Date ही कंपनीकडून ठरवली जाते. वर सांगितल्याप्रमाणे Dividend, Bonus वगैरे जाहीर करताना कंपनी (Board Of Directors) Record Date आणि Effective Date (Ex Date) जाहीर करत असते. हा shareholders चा कंपनीकडील record असतो ज्यात Corporate Action साठी पात्र सर्व shareholders ची लिस्ट असते. जर Record Date च्या दिवशी तुम्ही shares खरेदी करत असाल तर तुम्ही Dividend, Bonus साठी पात्र नसता. कंपनीच्या Corporate Action दरम्यान या Dates अत्यंत महत्वाच्या असतात. सामान्य shareholders ला या Dates लक्षात घेऊनच त्या कंपांनीच्या shares ची खरेदी विक्री केली जाते. EFFECTIVE DATE ही record date च्या एक-दोन दिवस (Working Days) आधी असते. जर Effective Date च्या दिवशीपर्यंत तुम्ही त्या कंपनीचा share hold करत असाल तर तुम्ही त्या Corporate Action साठी (Dividend, Bonus वगैरे) पात्र असता. तुम्ही Effective Date च्या दिवशी जरी share विकत (sell) असाल तरी तुम्ही Corporate Action साठी पात्र असता, लाभार्थी, पण याउलट.... जर तुम्ही Effective Date च्या दिवशीच त्या share ला खरेदी करत असाल तर Corporate Action साठी तुम्ही पात्र असणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर Corporate Action साठी पात्र ठरायचं असेल तर Effective Date च्या आधी तुम्ही ते खरेदी करू शकता आणि Effective Date च्या दिवशी किंवा नंतर केंव्हाही विकू शकता. PAYMENT DATE ला actually Dividend, Bonus इत्यादी shareholders ला मिळतात. एक उदाहरण – जर ABC या कंपनीने 5 रुपये dividend जाहीर केला असेल आणि त्यासाठी 25 ही Effective Date आणि 27 ही Record Date जाहीर केली असेल... आणि त्या कंपनीच्या share ची बाजारातील किम्मत 200 रुपये असेल... 1. जर तुमच्याकडे आधीपासूनच त्या कंपनीचे shares असतील आणि तुम्ही ते 24 तारखेला विकून टाकले तर तुम्ही Dividend साठी अपात्र असाल. 2. जर तुम्ही 25 तारखेला किंवा नंतर कधीही (जी Ex Date आहे) तुम्ही ते विकले तर तुम्ही पात्र असाल. 3. जर तुमच्याकडे त्या कंपनीचे shares नसतील आणि तुम्ही 24 तारखेला खरेदी करून 25 तारखेला किंवा नंतर विकले तरी तुम्ही पात्र असता. 4. पण जर तुम्ही 25 तारखेला खरेदी केले किंवा Record Date 27 तारखेला खरेदी केले तर तुम्ही Dividend साठी पात्र नसता. 5. यात अजून एक भाग असा आहे की, Effective Date च्या दिवशी त्या कंपनीच्या share ची किम्मत Dividend Amount ने कमी होते. या उदाहरणात, 25 तारखेला ABC चा share 5 रुपये कमी होऊन 195 रुपये होतो पण नियमित खरेदी-विक्री नियमांनुसार तो वधारू किंवा कमी होत राहतो. जे Long Term गुंतवणूकदार असतात त्यांना या Dates ने फार फरक पडत नाही. त्यांनी तो share hold केल्यामुळे Dividend, Bonus इत्यादी लाभ त्या गुंतवणूकदाराला मिळत राहतो. जे Arbitrage Opportunity शोधत असतात त्यांना या Dates महत्वाच्या असतात.
DEMATERIALIZATION

आधीच्या काळी shares खरेदी-विक्री प्रक्रिया Electronic पद्धतीने होत नसत. त्या काळी Physical Certificate असायचे ज्याद्वारे व्यवहार केले जात असत. ते Cerificate गुंतवणूकदाराला सांभाळून ठेवावे लागत आणि विक्री करताना submit करावे लागत. पण Electronic पद्धतीने ही प्रक्रिया जवळजवळ बंद झाली आहे. असं असलं तरी, काही लोकांकडे जुन्या काळी घेऊन ठेवलेले Shares Physical Format मध्ये असू शकतात. ते जर Electronic Format अर्थात Demat मध्ये ठेवण्यासाठी काही मूलभूत प्रक्रिया करावी लागते. याला आपण Dematerialization म्हणतो. एकंदरीत Physical Format मध्ये असलेले shares Electronic माध्यमात convert करणे. यासाठी Demat Account असणे अतिशय आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या गुंतवणूकदारणे 1999 काळी SBI चे shares घेऊन ठेवले आहेत. त्याकाळी Physical Certificate द्वारे व्यवहार केला जात असे. समजा त्या गुंतवणूकदाराने मध्यंतरीच्या काळात त्या shares ला काहीच केलेलं नाही. आज जर ते shares विकायचे असतील तर सर्वात आधी ते Physical Certificate त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर एक Demat Account असणे आवश्यक आहे. त्यात Physical Certificate आणि Demat एकाच्याच नावे असणे आवश्यक आहे. मग एका प्रक्रियेनुसार ते shares Demat वर जमा करता येतात त्यानंतर मग Demat खात्यावरून त्याचा व्यवहार करता येईल.
काही ठोकताळे आणि संकेत

मार्केट कोणत्या दिशेने जाईल हे खात्रीने कोणीही सांगू शकत नाही; फार तर अंदाज वर्तवता येतात. पण अशा काही घडामोडी, घटना आणि क्षण असतात जेंव्हा बाजारातील volatility वाढून मार्केटच्या दिशेचा अंदाज घेता येतो. महिन्याच्या सुरूवातीला वाहन क्षेत्रात, कोणत्या कंपांनीच्या गाड्यांचा किती खप झालाय याची आकडेवारी येत असते. बर्याोचदा traders यानुसार trading करत असतात. कारण त्यादिवशी वाहन कंपन्यांच्या shares मध्ये volatility जास्त असते. RBI तीन महिन्याला पतधोरण पॉलिसी जाहीर करत असते. त्या पॉलिसीच्या अनुषंगाने बाजारात बँकिंग क्षेत्रातील shares मध्ये मोठी उलाढाल होत असते. त्या दिवशी Intraday trading करणे risky तर असतेच पण नफ्याची उत्तम संधी मानली जाते. देशांतर्गत किंवा अंतरराष्ट्रीय पातळीवर जर काही मोठी राजकीय फेरबदल होत असतील किंवा काही नैसर्गिक आपत्ती असेल तेंव्हा share बाजारात मोठ्या प्रमाणात volatility असते. साधारणतः ख्रिसमस च्या दरम्यान पाश्चिमात्य देशांत सुट्टी असल्याने भारतीय बाजारातील पैशांचा ओघ कमी झालेला असतो जेणेकरून भारतीय बाजार संथगतीने कारभार करत असतो. देशाच्या अर्थसंकल्प वेळेस share बाजारात मोठी उलाढाल होत असते. कोणत्या क्षेत्राला किती निधि मिळतो, काही नवीन सरकारी योजना, देशाच्या अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्राला जास्त वाव दिला आहे किंवा तत्सम बाबी लक्षात घेऊन त्या क्षेत्राशी निगडीत कंपन्यांचे shares मध्ये मोठी खरेदी-विक्री होत असते. एक उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर, दिवाळी व ख्रिसमस काळात भारतात सुट्ट्या असतात व त्या काळात बर्यापच ठिकाणी घराला रंग देण्याचं काम केलं जातं. त्यामुळे Asian Paints, Berger Paints सारख्या रंग विक्रेत्या कंपन्यांचा चांगला नफा होतो. हा नफा मार्च क्वार्टर च्या निकालात (Final) प्रतीत होतो. ही शक्यता ग्राह्य धरून संबंधित कंपन्यांचे shares ह्या काळात वधारतात. गुंतवणूकदार हा काळ आणि नफा लक्षात घेऊन त्यात गुंतवणूक करत असतात. अशीच गोष्ट मान्सून आगमनच्या वेळेस असते. भारतीय अर्थव्यवस्था मान्सून अर्थात पावसावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याने पाऊस कसा होणार यावरही share बाजारातील पडझड व वाढ अवलंबून असते. पाऊस चांगला झाला तर irrigation, खते व कृषी क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या shares मध्ये चांगली वाढ होते. गुंतवणूकदारास share बाजार अशा अनेक संधी उपलब्ध करून देत असतो. Long Term गुंतवणूकदार असेल किंवा Intraday Trader त्याला ह्या बाबींचा अभ्यास करूनच share बाजारात पैसे लावले पाहिजेत. योग्य Stock ची निवड करणे इथेच अर्ध यश असतं.
WHAT IS RBI POLICY?

बँकाची बँक म्हंटली जाणारी RBI देशाच्या अर्थव्यवस्थेचा धांडोळा घेऊन महागाई, रोजगार आणि अर्थव्यवस्थेशी निगडीत सर्व बाबींचा आढावा घेते अन यावर उपाययोजना किंबहुना नियंत्रण करण्यासाठी तीन महिन्याला आपलं पतधोरण जाहीर करते त्याला RBI Policy म्हणतात. RBI Policy चे उद्दीष्ट हे अर्थव्यवस्थेला रुळावर आणणे आणि गती प्राप्त होईल अशी धोरणे राबवणे यासाठी कार्यरत असते. RBI Policy चा परिणाम थेटपणे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर आणि पर्यायाने अर्थव्यवस्था आणि सामान्य माणसावर होत असतो.
REPO RATE

ज्या Rate ने बँका government securities ला तारण ठेऊन RBI कडून अल्पमुदत कर्ज घेतात, त्या Rate ला Repo Rate म्हणतात. Repo rate is the rate at which the RBI lends short-term money to the banks against the govt approved securities. ज्याप्रकारे सामान्य ग्राहक काहीतरी तारण ठेऊन बँकेकडून कर्ज घेतो अन त्यावर व्याज देतो त्याचप्रमाणे बँका RBI कडून कर्ज घेतात. उदा. बँकेने जर RBI कडून 1000 रुपये कर्ज घेतलं असेल तर सध्याच्या 6.25% या Repo rate नुसार बँकेला RBI ला 1000 + 62.5 = 1062.5 इतके परत करावे लागतील. आता credit policy मध्ये जर Repo rate वाढवला तर बँकेचं आणि पर्यायाने सामान्य ग्राहकाचं कर्ज वाढेल अन बाजारात पैसे कमि होतील. असं केल्यास share बाजारात पडझड संभवते.
REVERSE REPO RATE

जेंव्हा बँका आपल्याकडील अतिरिक्त रक्कम काही काळासाठी RBI कडे ठेवते तेंव्हा RBI त्या रकमेवर ज्या Rate ने परतावा (व्याज) देईल त्याला Reverse Repo Rate म्हणतात. Reverse Repo rate is the rate at which banks deposit’s their short-term excess liquidity with the RBI. सामान्य ग्राहक आपले पैसे बँकेत ठेवतो व त्यावर व्याज मिळवतो तसा हा प्रकार. उदा. जर बँकेने आपली 1000 रुपयांची ठेव RBI कडे ठेवली तर सध्याच्या 5.75 या Reverse Repo Rate नुसार RBI बँकेला 1057.5 रुपये परत करेल. जर बँकेकडे अतिरिक्त असलेला पैसा गुंतवण्यास योग्य मार्ग नसेल किंवा त्यातून assured परतावा नसेल तर बँक आपला अतिरिक्त पैसा RBI कडे ठेवते. Credit Policy मध्ये जर Reverse Repo Rate वाढवला तर अतिरिक्त व्याजच्या आशेने बँका आपला पैसा RBI कडे ठेऊ लागतील जेणेकरून बाजारातील पैसा कमी होईल... यामुळे share बाजारावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते.
CASH RESERVE RATIO (CRR)

भारतातील बँकेना आपल्याकडे येणार्या0 डिपॉजिट रकमेपैकी काही रक्कम RBI कडे reserve करावी लागते; ती ज्या प्रमाणात ठेवावी लागते त्याला CRR म्हणतात. ही Reserve Amount RBI देशाच्या अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार वापरते. CRR चा दर वाढवला म्हणजे ती बँकेकडे कमी पैसा राहतो आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेत कमी पैसा खेळता राहतो. त्यामुळे CRR वाढवला तरी share बाजारात नकारात्मक प्रतिसाद उमटू शकतात. उदा. जर ग्राहकाचे 1000 रुपये बँकेत जमा असतील तर सध्याच्या 4% या CRR नुसार त्यातील 40 रुपये RBI कडे जमा करावे लागतात.
SLR – STATUTARY LIQUIDITY RATIO

भारतातील बँकेना, कस्टमरला क्रेडिट करण्यापूर्वी आपल्याकडील डिपॉजिट पैकी विशिष्ट प्रमाणातील रक्कम financial security किंवा गोल्ड मध्ये गुंतवावी लागते, maintain करावी लागते. या प्रमाणाला SLR म्हणतात. उदा. बँकेकडील 1000 रुपयांच्या ठेवीकरिता बँकेला सध्याच्या 20% या SLR प्रमाणे 200 रुपयांचे डिपॉजिट financial security or gold मध्ये ठेवावे लागते. अर्थात, याचा interest बँकेला मिळत असतो. SLR चा दर वाढवला तरी तो share बाजारावर नकारात्मक परिणाम करू शकतो. कारण जोपर्यंत बँकेकडे पैसा राहणार नाही तोपर्यंत सामान्य ग्राहकाला त्याचा फायदा मिळणार नाही. आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेत पैसा खेळता न राहिल्याने महागाई वाढू शकते अन अर्थव्यवस्था मंद होऊ शकते. एकंदरीत, RBI Policy चा share बाजारावर परिणाम होतोच, त्यामुळे volatility ही मिळते पण तो नेमका कोणत्या प्रकारे होईल ते सांगता येत नाही.
BASIS POINT

1% is equivalent to 100 basis point. उदा. Repo Rate 7.75 आहे आणि तो 25 basis point ने वाढवला म्हणजे 25/100 = 0.25 असा होतो... 7.75 + 0.25 = 8 http://www.sai-intradaytips.in/RBI-policy-affects-stock-market.asp

No comments:

Post a Comment

Start-up Street: Social justice and the start-up ecosystem

Disparities in start-ups are a global phenomenon and affirmative action is needed to ensure an equal opportunities environment for aspiring...