हावडा ब्रिज

                                 हावडा ब्रिज 

जय हिंद मित्रहो ...........              कोलकाता म्हणल कि सर्वात अगोदर आपल्या डोळे पुढे हावडा ब्रिज उभा टाकतो ......माझी DUTY आसाम ह्या राज्या मध्ये असलेल्या  मुळे आम्हला आसाम जायचे म्हणल तर कोलकता वरूनच जाव लागत होत  ....मी ५० दिवस सुट्टी संपून अस्साम्म ला निघलो व माझ्या पुढच्या ट्रेन ला वेळ असलेल्या  मुळे मी कोलकता च्या ब्रिज वर तब्बल 2 तास घालवले....

अतिशय सुंदर असा पुल बघत रहाव अस वाटत ........

कोलकता व शेजारील हावडा शहराला जोडणारा हा पूल ....
१९४२ साली बांधकाम पूर्ण झाल ....ह्या पुलाला नदीपात्रा मध्ये  एकहि खांब वापरला गेला नाही.... 

पुलाच्या बांधणीसाठी त्याकाळी जमशेटजी टाटांच्या ‘टाटा स्टीलने’ लोखंडाचा पुरवठा केला होता.
जवळपास २६.५ हजार टन लोखंड वापरून उभारलेल्या या पुलाची लांबी १५२८ फूट तर रुंदी ६२ फूट आहे. नदी पात्रात जवळपास २८२ फूट उंचीवर विराजमान हा पूल त्याकाळातील जगातला तिसऱ्या क्रमांकाचा पूल होता
           १९४२ साली बांधून पूर्ण झालेल्या या पुलाची खासियत अशी की या पुलाच्या बांधणीत एकही नट-बोल्ट वापरला गेलेला नाही. तसेच या पुलाला नदीपात्रात एकही खांब नाही. नदीच्या दोन्ही तटांवर ‘कँटीलिव्हर’ पद्धतीने या पुलाची उभारणी केली गेलेली आहे..........









संपूर्ण लोखंडी खिळेन बनलेला हा पूल आज हि इतका मजबूत आहे कि ..दररोज जवळपास सव्वा लाख वाहने ..आणि पाच लाख पादचारी या पुलाचा नियमित वापर करतात.......






एक प्रेक्षणीय ठिकाण या नात्याने दरवर्षी लाखो पर्यटक देश-विदेशातून या पुलाला भेट देतात. देशातलं सर्वात जुनं म्हणून नावारूपाला आलेलं ‘हावडा जंक्शन’ जोडणारा पूल म्हणूनही या पुलाचे प्रचंड महत्व आहे.
पुलाच्या कलकत्त्याच्या बाजूला असणारे ‘मालिक घाट’ हे फूल मार्केट आजही तिथे चालणाऱ्या फुलांच्या व्यापाराकरता प्रसिद्ध आहे. वाहतुकीचा प्रचंड बोजा सहन करत हा पूल आजही दिमाखात उभा आहे.
 











ऐतिहासिक स्मारकाचे महत्व असलेल्या या पुलाला, पुलाच्या खांबांना दरवर्षी, लाखो लोक पान खाऊन आणि तंबाखूच्या पिंक टाकून रंगवतात…

तरीही ऊन, वारा, पाऊस, वादळे यांची पर्वा न करता, मुकाटपणे वाहने आणि लोकांना ऐलतीरावरून पैलतीरावर नेण्याचे काम



जय हिंद जय महाराष्ट्र ..........कसा वाटला नक्कीच सांगा 


No comments:

Post a Comment

Start-up Street: Social justice and the start-up ecosystem

Disparities in start-ups are a global phenomenon and affirmative action is needed to ensure an equal opportunities environment for aspiring...