गुंतवणूकी साठी शेयर कसा निवडावा.....

 गुंतवणुकीसाठी Shares कसे निवडावे.... 


सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण shares बद्दल जे बोलत आहोत, त्यासंबंधी ज्या Terminolgy आणि संकल्पना बघत आहोत ती सगळी माहिती आपल्याला कोठून मिळू शकते. म्हणजे ह्या सर्व महितीचा SOURCE काय असू शकतो? काही वर्षांपूर्वी जेंव्हा इंटरनेट, computers याचा वापर तितकासा प्रचलित नव्हता तेंव्हा विविध newspaper आणि टीव्हीवरील news channels या माध्यमातून ही माहिती घ्यावी लागायची. पण आता विविध websites आणि mobile apps च्या माध्यमातून हवी ती माहिती मिळू शकते. कोणतीही कंपनीबद्दल हवी ती माहिती इंटरनेटवर मिळू शकते आणि Shares बद्दलची सर्व माहिती ह्या websites वर मिळू शकते. आपण Corporate Actions मध्ये Dividend, Bonus वगैरे गोष्टी बघितल्या. या सर्वांचा record आपल्याला या websites वर मिळू शकते. याचा आजपर्यंतचा सर्व record तिथे मिळू शकतो. Share चा आजचा rate, open, close, 52 week high-low, आजपर्यंतचा Low, कंपनी कधी सुरू झाली, त्याचे Qurterly Results, वार्षिक results, कंपनी कधी सुरू झाली, कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे, Balance Sheet अशा सर्व माहिती ह्या website आणि apps वर मिळू शकते. http://www.moneycontrol.com वर नमूद केलेली Moneycontrol ही website आहे. या वेबसाइटवर कंपनी आणि share बद्दल सर्व माहिती मिळू शकते. ही माहिती मिळाल्याच्या नंतर त्याचं Analysys करून योग्य share निवडावा लागतो. प्रत्येक गुंतवणूकदार काही Fundamental Analysys किंवा Technical Analysys असा अभ्यास करू शकत नाही. किंवा प्रत्येकाला Investment Advisor नियुक्त करणे शक्य नसते. तरीही मूलभूत बाबी तपासून गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी योग्य share निवडू शकतो. हे करता यावे यासाठी ह्या पुस्तकात ज्या Terminology आपण शिकलेल्या आहेत त्या लक्षात घेणे महत्वाचं आहे.

PROCESS


तुम्ही जर Long Term गुंतवणूकदार असाल आणि एक विशिष्ट रक्कम घेऊन बाजारात येत असाल आणि नंतर टप्प्याटप्प्याने त्यात रक्कम अॅड करू इच्छित असाल तर तुम्हाला सर्वप्रथम PORTFOLIO चा विचार करावा लागेल. कोणत्या Sector मध्ये किती पैसा गुंतवायचा याचं गणित लक्षात घेतलं पाहिजे. PORTFOLIO चं गणित सोडवल्यानंतर एखाद्या sector मधील कोणता share घ्यायचा हा यक्ष प्रश्न असतो. तो Blue chip असावा, Multibagger असावा, Largecap, Midcap, smallcap असावा हे आधी ठरवावे लागेल. खालील लिंक तपासा. NSE च्या website वर विविध Index दिसतील. आता समजा मला Pharma sector मधील चांगला share गुंतवणुकीसाठी निवडायचा आहे. त्या वेबसाइटवर Nifty Pharma index आहे ते तपासा. त्या क्षेत्रातील दर्जेदार shares ची यादी दिसेल. त्यात Largecap किंवा Midcap असू शकतात. तिथे list असलेल्या प्रत्येक share चा 52 week high आणि low दिसेल. समजा तिथे एक xyz हा share आहे. त्याची आजची किम्मत आहे 150. त्याचा 52 week high आहे 200 आणि 52 week low आहे 135. याचा अर्थ तो आपल्या वर्षभरातील low price च्या जवळ कार्यरत आहे. आज तारीख आहे 15 Dec. तेथील chart नुसार तुम्हाला माहिती मिळेल, 52 week low हा Nov महिन्यातील आहे आणि 52 week hiigh हा March महिन्यातील आहे. याचा अर्थ, काही कारणांमुळे तो कोसळत आला आहे. दूसरा एक share आहे pqr. त्याची आजची किम्मत 450 आहे. 52 week high याच महिन्यातील 490 आहे आणि May मध्ये या share ने 320 हा 52 week low नोंदवला आहे. याचा अर्थ, काही कारणांमुळे हा share चांगली कामगिरी करत असून आपल्या 52 week high च्या जवळ कार्यरत आहे. ही मूलभूत माहिती घेऊन तुम्ही http://www.moneycontrol.com या moneycontrol या वेबसाइटवर जा. तिथे वर असलेल्या Search box मध्ये xyz search करा. तिथे त्या share चा 52 week high-low, todays high low इत्यादी माहिती तपासावी. त्याखालोखाल त्या share चा graph / chart दिसेल. त्या chart मध्ये त्या share ची कामगिरी दिसून येईल. एकदिवसीय, एक महिना, तीन महीने, सहा महीने, एक वर्ष, दोन वर्षे, पाच वर्षे आणि max असे graph pattern तुम्हाला दिसतील. त्यावरून तुम्ही त्या share च्या कामगिरी चा अंदाज घेऊ शकता. तो share volatile असतो का किंवा त्याची वाढ कितपत आहे हेही समजतं. xyz आणि pqr या दोन्ही shares चे ग्राफ तपासून पहा. दोघांचाही performance तपासवा. Share मूळ कुठल्या किमतीपासून जास्त वाढला/पडला आहे, कोणत्या काळापासून वाढला/पडला आहे. Graph च्या खाली share ची इतर माहिती मिळेल. Face Value, EPS, P/E ratio, Dividend, dividend yield ही माहिती मिळेल. वर ह्या सर्वांबद्दल माहिती घेतलेली आहे. EPS जास्त असणे म्हणजे share चांगला, P/E Ratio कमी असणे, चांगला dividend असणे ह्या बाबी share च्या दृष्टीकोणातून चांगल्या असतात. त्यानंतर वेबसाइटवर उजव्या हाताला News मध्ये तुम्हाला त्या कंपनी संबंधित latest actions बद्दल माहिती मिळेल. म्हणजे त्या कंपनीला नवीन कुठला contract भेटला आहे का, कुठे नवीन plant सुरू केलं आहे का, विविध तज्ञांची त्या कंपनीबद्धलची मते असतात. त्यावरही लक्ष असायला हवं. यानंतर Left side ला विविध options दिसतील. त्यात News मध्ये कंपनी संबंधित news असतात. Announcement मध्ये कंपनीने केलेल्या घोषणा असतात. Corporate Action मध्ये त्या share ने आजपर्यंत किती dividend दिला आहे, Bonus, Right Issue, split इत्यादि माहीत मिळते. Dividend हा कंपनीच्या नफ्यातून दिला जातो. तो जर चांगला दिला असेल तर कंपनीचा नफा चांगला आहे, म्हणजे कंपनी चांगली आहे. अर्थात हा काही एकमेव parameter असू शकत नाही. Right Issue, Bonus मुळे बाजारातील shares ची संख्या वाढते, त्यामुळे काही काळासाठी तरी share ची किम्मत वधारू शकते. Buy Back असेल आणि कंपनी चांगल्या rate ने shares बाजारातून खरेदी करत असेल तर buy back date येईपर्यंत त्या share ची किम्मत वधू शकते. तेवढ्या काळासाठी तुम्ही ते shares खरेदी करू शकता. त्यानंतर Financial मध्ये त्या कंपनीचा Qurterly Results, Annual Results आणि कंपनीची Balance Sheet दिसेल. यातील समजत असेल तरच हे यात लक्ष घालावे. Shareholding मध्ये त्या कंपनीत कोणाचा किती वाटा आहे ही माहिती भेटते. PEERS हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. यामध्ये त्या क्षेत्रातील कंपन्यांची capital नुसार Top to Bottom असा क्रम असतो. शिवाय त्याचा sales turnover, net profit आणि total asset अशी माहितीही मिळते. त्या सर्वांची तुलना आपण करू शकतो. समजा, xyz हा PEERS मध्ये pqr पेक्षा वर आहे, तर xyz हा pqr पेक्षा ही सरस समजू शकता. कदाचित काही कारणांमुळे xyz चे net profit चांगलं नसेल आणि pqr चा performance चांगला असू शकतो. त्यानंतर दोघांचा eps आणि P/E ratio तुलना करावा. Xyz ही त्या क्षेत्रातील सर्वोत्तम कंपनी असेल आणि काही कारणास्तव सध्या underperform करत असेल पण भविष्यात ती कंपनी सर्व समस्या सोडवून चांगली कामगिरी करू शकत असेल तर त्यात पैसे गुंतवायला हरकत नाही.


एखाद्या कंपनीने भूतकाळात कसा performance केला आहे यापेक्षा तो भविष्यात कसा performance देऊ शकतो हे जास्त महत्वाचे आहे. जर pqr ही कंपनी सतत चांगला performance देत असेल तर काही वर्षानी pqr कंपनी xyz ला मागे टाकून पुढे जाऊ शकते. अशा स्थितीत pqr मध्ये गुंतवणूक उत्तम ठरेल.

Levels

एखादा share कसा वाढत जातो याचाही थोडा अभ्यास असायला हवा. ज्या share ची किम्मत आज समजा 500 रुपये आहे, तो share काही रोज वाढता राहून ह्या किमतीपर्यंत आलेला नसतो. कधी कमी होत तर कधी वाढत तो इथपर्यंत पोचलेला असतो. प्रवासाला निघालेली गाडी सलग वेगाने धावत जाऊन आपल्या मुक्कामापर्यन्त पोहोचत नाही. कुठेतरी विश्राम घेत, पेट्रोल भरून वगैरे असे विविध टप्पे ओलांडत ती आपल्या मुक्कामी पोचते. Shares च ही असच असतं. काही अपवाद वगळता, सगळेच shares हे विश्रांती घेत घेत पुढे जातात. एखादा share समजा 150 रुपयांना आहे आणि तो खूप चांगला आहे, तर तो रोज वाढतच जाईल असं काही नसतं. तो हळूहळू 200 पर्यन्त पोचेल. ज्यांनी तो 150 च्या आसपास घेतलेला आहे त्यातील काही ह्या पातळीवर विकतील. मग तो थोडासा खाली येऊन काही दिवस 200 च्या आसपासच कार्यरत राहील. मग काही news किंवा सकारात्मक घटना घडली की तिथे अजून नवे गुंतवणूकदार तो share buy करतील आणि मग तो 280 पर्यन्त जाईल. मग समजा एकंदरीत बाजारात किंवा त्या share च्या sector मध्ये मंडी आली किंवा काही नकारात्मक news असेल तर परत तो खाली येईल. कंपनी चांगली आहे असं गृहीत धरून त्या पातळीवर परत नवे गुंतवणूकदार येतील. असं करत करत तो share वाढत जाईल. कमी होण्याची किंवा कोसळण्याची प्रक्रिया वेगाने असू शकते, कारण नकारात्मक news असेल तर अचानक विक्री वाढू शकते. खूप धावल्यानंतर जशी एखादी गाडी जशी विश्रांतीसाठी थांबते तसाच share ही मोठ्या वाढीनंतर एका पातळीवर थोडासा stable राहू शकतो. एखादा share रोजच वाढतोय असं होणार नाही. तीन चार दिवस वाढेल मग एक दिवस कमी होईल. या सगळ्या data वरुन आपल्याला त्या shares च्या विविध level माहिती होतात. म्हणजे कुठे तो अडखळतो, थांबतो किंवा वाढत जातो. गुंतवणूक करताना ह्या level बघितलं तर योग्य किमतीला गुंतवणूक करणे सोपं जातं. Monecontrol या वेबसाइटवर असलेला सर्व data व्यवस्थित पडताळून पहावा, त्यानंतर आपण शिकलेल्या terms (dividend, eps, 52 week high-low वगैरे) तेथे तपासल्या पाहिजेत. मग आपल्याला समजतील तशा त्या share च्या level चा विचार करावा आणि त्यानंतर गुंतवणुकीसाठी योग्य share निवडावा.

No comments:

Post a Comment

Start-up Street: Social justice and the start-up ecosystem

Disparities in start-ups are a global phenomenon and affirmative action is needed to ensure an equal opportunities environment for aspiring...