आमची गुण्या माय...
रामपार्यात चहाच्या घोट घेऊन ' ईनामात( शेतात) जाऊन .. खंळ खळ .. रान निंदून काढणारी आमची गुण्या माय मला म्हणली .. " कधी जायचं ..आसामाला.. duty ला जनु .. " मी म्हणालो हाव अजून .. आखाडीच्या जत्र पर्यंत ..आणि पुढे म्हणालो .. बरं हाय का आमंदाच साल.. तवा गुण्या माय म्हणली आमंदाच साल तर लई चांगल हाय बापू ... मोड तर सोन्या सारखा हाय .. अजुन तर खात सुद्धा घातला नाही ... खात घातल्यावर तर अजुन खुलल... आणं पुढे म्हणाली ... यंदा .. गावरान दोडक्याच.. भेंडराच .. चवळीच .. आणं शेंडणीच बीच .. घालायच.. ईसरून गेल .. घातले असल तर ... दोन्ह तीन महिन्याच्या भाजीचा कुटाना .... मिठला असता .. आण दरवर्षी सजगुरे बि एक वळभर राहायचे . लेकरायला " खारोड्या , पापड्या आणि मलिदा साठी यंदा समंदे इसरल .. बापू .. ह्या ऊसाच्या आण कापसाच्या नादात ... म्हणून आलाव रामंपार्यात .. आता तरी खळं खळं रान निंदून निट कराव ..म्हणून ..
जनार्धन पाटील भुत्ते ..
मो.9766738673..

धीरज सर मनस्वी आभार तुम्ही आमच्या ब्लॉग ला भेट दिल्या बदल
ReplyDelete