Share बाजारात नव्याने येणार्याच व्यक्तिला मूलभूत प्रश्न असा असतो की मी जर कुठला share खरेदी करत असेन तर विकणारा कोण असतो अन मी विकत असेन तर खरेदी कोण करतो?? तसं पाहता ह्या तांत्रिक प्रक्रियेशी आपल्याला तसं फार देणं घेणं नसतं. आपल्याला हव्या असलेल्या rate ला तो share आल्यावर खरेदी किंवा विक्री करणे हा महत्वाचा मुद्दा. पण उदाहरण द्यायचं झालं तर... आपण एखादी वस्तु खरेदी करण्यासाठी मॉलमध्ये जातो. हवी असलेली वस्तु योग्य दरात मिळत असेल तरच आपण ती विकत घेतो. ती वस्तु मॉलमध्ये त्या कंपनीने त्यांना परवडणार्याप किमतीत विक्रीला ठेवलेली असते. मॉल ही जशी खरेदी विक्रीची जागा झाली, देवाणघेवाण करण्याची जागा झाली तसेच shares ची खरेदी-विक्री करण्यासाठी एक जागा असते; आपण त्याला EXCHANGE BOARD म्हणतो. उदाहरण, NSE - NATIONAL STOCK OF EXCHANGE किंवा BSE – BOMBAY STOCK OF EXCHANGE. यांच्यामार्फत shares ची देवाण-घेवाण होते. असे विविध exchange आहेत. तुम्हाला PQR हा share हवा असेल तर तुम्ही ब्रोकरच्या मार्फत exchange वर तुम्हाला हव्या असलेल्या किमतीला तो demand करता. आणि पलीकडे तुमच्यासारखाच एक गुंतवणूकदार जर PQR share विकू इच्छित असेल तर तोही exchange कडे त्याला विक्रीस ठेवतो. असे अनेक खरेदी-विक्री करणारे exchange कडे आपआपल्या रेट ला तो खरेदी-विक्रीला ठेवतात. आता जर PQR चा बाजारातील रेट 250 असेल तर खरेदी-विक्री करणार्यांेना त्याच किमतीच्या आसपासचा रेट द्यावा लागतो. कारण तुम्ही जर 200 रूपयांचा खरेदी रेट टाकला तर विक्री करणारा इतक्या कमी रेट ला तो विकणार नाही कारण त्या share ची बाजार value 250 आहे. याहून सोप्पं उदाहरण असेल ते निलामीचं! शेतकरी जेंव्हा त्याचा माल कृषि उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणतो तेंव्हा त्या मालाची बोली लावली जाते. बोली लावणारे त्यांना परवडणारी/पटणारी किम्मत देऊन बोली लावतात. जो सर्वात जास्त किम्मत करेल अन बोली लावेल आणि जर त्या शेतकर्या्ला तो मान्य असेल तर त्या उत्पादनाची देवाण-घेवाण होते. तो माल किंवा उत्पादन बाजारात विक्री करण्यासाठी जसे दलाल आणि बाजार समिती पैसे घेते तसेच shares खरेदी-विक्री प्रक्रियेवर brokerage houses (Angel Broking, Motilal Oswal इत्यादी) आणि exchanges (NSE, BSE) त्यावर पैसे आकारतात. बाजारात विक्रीस आलेला उत्पादन जर दर्जेदार असेल, त्या उत्पादनाला मागणी जास्त असेल व त्याचे विक्रेते कमी असतील तर त्याची किम्मत वाढते. म्हणजे, ते उत्पादन खरेदी करण्यासाठी शंभर खरेदीकर्ते तयार असतील, विक्रेते सात-आठच असतील तर त्यांच्यात चढाओढ लागून सर्वाधिक किम्मत करणार्यालला ते उत्पादन मिळतं. यानुसारच त्या उत्पादनाची किम्मत ठरते... हेच तंत्र share च्या बाबतीत लागू होतं. अलीकडील उदाहरण द्यायचं म्हंटलं तर, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारी बँकांना दोन लाख कोटींची मदत जाहिर केली. त्यामुळे त्या बंकांची पत सुधारण्यात मदत होणार होती. यामुळे त्या बँकाच नफा व परिस्थिती वाढेल आणि चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा वाढली. या कारणास्तव दुसर्याण दिवशी अचानक त्या बँकेच्या shares मध्ये खरेदी वाढली, आणि ते त्या shares ची किम्मत वाढली. ही झाली shares आणि त्याच्या खरेदी-विक्रीची संपूर्ण प्रक्रिय
TYPES OF MARKET = > PRIMARY MARKET
|
जेंव्हा एखादी अस्तीत्वात असलेली कंपनी share बाजारात नव्याने उतरत असते, ज्या प्रक्रियेतून त्या कंपनीला भांडवल निर्मिती करता येते, तेंव्हा SEBI च्या परवानगीने ती Stock Exchange मध्ये list होत असते. सामान्य गुंतवणूकदारांना त्यात सहभाग घेता यावा अन त्या कंपनीचे shares घेऊन कंपनीत भागधारक होता यावे यासाठी ती प्रक्रिया असते. या प्रक्रियेला IPO - Initial Public Offering प्रक्रिया म्हणतात. या प्रक्रियेतून कंपनीलाही भांडवल उभं करता येतं. यात कंपनीला स्वतःची सर्व माहिती जाहीर करावी लागते. Share चा दर ठरवलेला असतो. सामान्य गुंतवणूकदार या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. याला primary market म्हणतात. जेथे सामान्य गुंतवणूकदार थेट कंपनीकडून shares खरेदी करून भागधारक होतो. उदाहरणार्थ, Avenue Supermart कंपनीचा share हा बाजारात नव्याने आणला जात होता. तो share खरेदी करता यावा म्हणून IPO चा form भरून तो खरेदी करणे ही Primary market प्रक्रिया.
|
ज्या मार्केटमधून गुंतवणूकदार थेट बाजारातून shares खरेदी किंवा विक्री करतो त्याला Secondary Market म्हणतात. म्हणजे, ज्या कंपनीचा share बाजारात आधीपासूनच उपलब्ध आहे, त्याचे rates रोज कमी-जास्त होत असतात, जिथे रोज वेगवेगळे खरेदी-विक्री करणारे असतात ते मार्केट म्हणजे Secondary Market. उदाहरणार्थ, Infosys कंपनीचा share बाजारात आधीपासूनच उपलब्ध आहे. त्याची खरेदी विक्री म्हणजे secondary market. साधारणपणे, थेट कंपांनीकडून shares खरेदी केले जात असतील तर त्याला primary market आणि बाजारातून exchange मार्फत जर shares ची खरेदी-विक्री होत असेल तर त्याला secondary market trading म्हणतात. याशिवाय मार्केटमध्ये derivatives, currency, debentures, bonds हेसुद्धा प्रकार असतात.
|
TYPES OF INVESTMENT IN SHARE MARKET
|
तसं पाहायला गेलं तर प्रत्येक investor वेगळा investor असतो. प्रत्येकाच्या गुंतवणुकीच्या गरजा, हेतु, कारणे वेगवेगळी असू शकतात. प्रत्येकजण स्वतःच्या personality आणि rquirement नुसार invest आणि trade करत असतो.
|
या प्रकारात तुम्ही एखाद्या कंपनीचा share आजच खरेदी करता अन आजच विकता. भारतीय Share बाजार सकाळी 9.15 ला सुरू होतो अन दुपारी 3.30 ला बंद होतो. ह्या एकदिवसीय कालावधीत जर share खरेदी केला अन विकूनही टाकला तर त्याला Intraday Trading म्हणतात. असं करण्याचे काही फायदेही आहेत अन तोटेही. पण Intraday Trading करण्यामागे कमी कालावधीत जास्त पैसे मिळवणे हा हेतु असतो. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीबद्दल काही सकारात्मक बातमी असेल किंवा त्या कंपनीचे आज चांगले त्रैमासिक निकाल (Quarterly Results) अपेक्षित असतील तर सकाळी तो share जास्त quantity ने खरेदी करायचा अन चांगला परतावा मिळताच त्याच दिवसात विकून टाकायचा. फायदे- कमी कालावधीतं चांगल्या परतव्याची शक्यता असते. Intraday trading करण्यासाठी ब्रोकर किंवा कंपनी तुम्हाला margin (साध्या भाषेत उधारी) देते ज्यात तुम्ही 100 रुपये असतांनाही 1000 रुपयांपर्यंत खरेदी-विक्री करू शकता. पण अट अशी असते की तो trade तुम्हाला त्याच दिवशी संपवावा लागतो. Intraday Trading साठी brokerage कमी आकारलं जातं. साधारणपणे traded value 0.1% असतं जे खरेदी अन विक्री करताना द्यावं लागतं. तोटे- यामध्ये रिस्क अधिक आहे. दिवसातला पूर्णवेळ (trade पूर्ण होईपर्यंत) तुम्हाला यावर खर्च करावा लागेल. कारण त्या share ची किम्मत कमी-जास्त होत असते अन योग्य दर येताच तुम्हाला तो विकावा लागतो.
|
DELIVERY OR POSITIONAL INVESTMENT
|
सामान्यपणे, एखादा share आज खरेदी करून नंतर विकणे म्हणजे delivery or long term investment. जर भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल किंवा काही कालावधीनंतर चांगला परतावा हवा असेल तर delivery investment केली जाते. उदाहरणार्थ, नोकरी करणारी व्यक्ति रिटायरमेंट किंवा त्याच्या मुलांच्या भविष्यासाठी दहा-बारा वर्षांकरिता गुंतवणूक करत असेल तर ती long term investment असते. किंवा आज एखाद्या share मध्ये गुंतवणूक केली अन दहा दिवसांत किंवा दोन महिन्यांत जर चांगला परतावा मिळणे अपेक्षित असेल तर त्याला positional investment/Short term म्हणतात. उदाहरणार्थ, जर पुढील आठवड्यात देशाच्या economy बाबतीत काही महत्वाची घोषणा होणे अपेक्षित असेल तर आपण त्याच्याशी संबंधित shares घेऊन ठेऊ शकतो जे आपल्याला चांगला परतावा देऊ शकतात. अशा छोट्या कालावधीच्या गुंतवणुकीला Positional Investment म्हणतात. फायदे – या प्रकारच्या गुंतवणुकीत रिस्क कमी असते. वेळेचा अपव्यय टळतो. दरम्यानच्या काळात dividend सारखे छोटे फायदे मिळतात. कंपनी चांगली असेल तर तो share तुम्ही hold करू शकता. तोटे – कालावधी जास्त असेल आणि चुकीच्या share मध्ये जर पैसा गुंतवला असेल तर चांगला परतावा मिळत नाही. शिवाय अडचणीच्या काळी जर पैसा हवा असेल आणि काही कारणास्तव त्या कंपनीचा share तोट्यात असेल तर तुमची गुंतवणूक निष्फळ ठरते. पैसे अडकून राहण्याची शक्यता असते. Delivery Investment मध्ये brokerage Intraday Trading पेक्षा जास्त असतं. साधारणपणे, ते total traded value च्या 0.3 तो 0.5% असतं जे खरेदी आणि विक्री करताना द्यावं लागतं.
|
ज्याप्रकारे वर्गाला मॉनिटर असतो, महापालिकेला आयुक्त त्याप्रकारे share market अन संबंधित गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी अन नियंत्रित करण्यासाठी एक स्वतंत्र सरकारी संस्था आहे. त्याचं नाव आहे SEBI (Securities & Exchange Board Of India) SEBI "protect the interests of investors in securities and to promote the development of, and to regulate the securities market and for matters connected there with or incidental there to." एकंदरीत, ह्या क्षेत्रात होणार्या वाईट गोष्टींना प्रतिबंध लावणे, नियमन करणे, त्यावर देखरेख ठेवणे अन सामान्य गुंतवणूकदारांच्या हक्काचं संरक्षण करणे हे या संस्थेचं काम आहे. SEBI ही संस्था share बाजारात होणार्याे अनियमित व चुकीच्या गोष्टींवर प्रतिबंध आणतात. बर्या चदा बनावट कंपनी किंवा अन्य मार्गाने या प्रवृत्ती गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करत असतात ज्यावर SEBI देखरेख ठेवत असते. सामान्य गुंतवणूकदारची फसवणूक होऊ नये ही जबाबदारीही SEBI ची असते. त्यामुळे, सर्वात महत्वाची आणि लक्षात ठेवायची बाब म्हणजे, येथे आपल्या पैसे सुरक्षित असतात. Share बाजारातील गुंतवणूक ही पैसा बुडवते ही संकल्पना चुकीची आहे. जोपर्यंत गुंतवणूकदार चुकीचे निर्णय घेत नाही तोपर्यंत share बाजारातील पैसा बुडत नाही; फार तर गुंतवलेला पैसा कमी परतावा देईल, उशिरा परतावा देईल पण तो कायमचा बुडेल हे चूक आहे. योग्य गुंतवणूक करणे, दर्जेदार कंपन्यांचे shares घेणे आणि, चौकशी करून निर्णय घेणे आणि योग्य सल्लागार नेमणे हे आपलं मुख्य काम आहे. न करायच्या गोष्टी – Demat account काढताना ब्रोकरची पूर्ण माहिती मिळवणे. शक्यतो ओळखीच्या अन विश्वासू ब्रोकरकडे खातं उघडणे. जर Demat account online प्रक्रिया करून सुरू करत असाल तर विशेष काळजी घ्यावी. या क्षेत्रात कोणाच्याही हातात कॅश पैसे देण्याची आवश्यकता नसते. जे व्यवहार होतात ते चेक किंवा ऑनलाइन ट्रान्सफरद्वारे होतात. चेक कधीच individual नावाने नसतो. चेक नेहमी brokerage company // DP च्या नावाने असतो. तुम्ही ब्रोकरला किंवा agent ला कसलेही पैसे देणे लागत नाहीत. कोणाच्याही सांगण्यावरून shares खरेदी-विक्री करणे चुकीचं आहे. जोपर्यंत तुम्ही चूक करत नाहीत तोपर्यंत तुमचे पैसे कुठेच जात नाहीत. सुरूवातीला शक्यतो चांगल्या, दर्जेदार, ब्ल्यु चीप कंपन्यांत गुंतवणूक करावी. जर share market चं trading software (ज्याद्वारे तुम्ही actual खरेदी-विक्री करू शकता) वापण्यात अडचण येत असेल तर त्याद्वारे खरेदी विक्री न करता ब्रोकरमार्फत खरेदी-विक्री करावी. त्यासाठी वेगळे पैसे लागत नसतात. इंटरनेटच्या एका क्लिक वर तुम्हाला याबद्दल सर्व माहिती मिळू शकते. किंवा काही शंका असल्यास तुम्ही माहितीगार व्यक्तिला विचारू शकता किंवा SEBI, Brokerage Firm इत्यादी संस्थांचे कॉल सेंटर/ईमेल असतात जेथे तुम्ही चौकशी करू शकता.
|
TRADING & SETTLEMENT // SHARE खरेदी करताना अन विक्री झाल्यावर...
|
Shares खरेदी करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला demat खात्यात पैसे टाकावे लागतात. Demat मध्ये पैसे टाकण्याचे दोन मार्ग आहेत. 1. एक म्हणजे Online Transfer ह्या प्रक्रियेद्वारे... Digital Way Of Payment यासाठी आधी तुमचं Demat खातं तुमच्या बँकेच्या savings खात्याशी लिंक केलं पाहिजे. शिवाय तुमच्या savings account ला Internet Banking ही सुविधाही उपलब्ध पाहिजे. 2. Demat खात्यात पैसे जमा करण्याचा दूसरा पर्याय आहे Cheque payment अर्थात Physical Way Of Payment यामध्ये, तुम्हाला brokerage कंपनीच्या नावाने cheque द्यावा लागतो. अर्थात, जर तुमचे Demat Angel Broking कडे maintain असेल तर “angel broking pvt ltd” या नावाने cheque द्यावा लागतो. उदाहरणार्थ, तुमच्या Demat खात्यात जर दहा हजार रुपये असतील तर तुम्ही तेवढ्या किमतीचे कोणतेही shares खरेदी करू शकतात. मागे सांगितल्याप्रमाणे त्या खरेदी किमतीवर brokerage company brokerage आणि सरकार टॅक्स आकारते. Demat खात्यावर पैसे असतील तरच तुम्ही shares खरेदी करू शकतात. जर तुम्ही आज shares विकले तर विकलेल्या shares ची amount Demat खात्यावर संध्याकाळपर्यन्त दिसेल, पण ते पैसे तुम्हाला दोन दिवसांच्या अवधिनंतर आपल्या savings खात्यात मिळू शकतात. विकलेल्या दिवशी लागलीच पैसे मिळत नसतात. त्याला T + 2 settlement असं म्हणतात. त्यामुळे argent गरज असेल तर share बाजार गुंतवणुकीतील पैसे तातडीने मिळतील याची खात्री नसते. पण दोन दिवसांनी संपूर्ण रक्कम तुमच्या savings खात्यावर ट्रान्सफर करता येते. Shares खरेदीमध्ये दूसरा भाग आहे मार्जिन ट्रेडिंगचा. समजा, तुमच्याकडे जर आधीचेच खरेदी केलेले चाळीस हजारांचे shares (portfolio) आहेत अन दहा हजार कॅश Demat ला जमा आहे. तुम्हाला आता पंधरा-वीस हजारांचे shares खरेदी करायचे आहेत. तर brokerage company तुम्हाला तुमच्या आधीचे shares वर उधारी (margin) देते अन तुम्ही पंधरा हजारपर्यन्त (तुमच्या खात्यावर किती किमतीचे shares आहेत यावर ही उधार अर्थात margin amount ठरत असते) खरेदी करू शकता. म्हणजे, फक्त दहा हजार असतांनाही तुम्ही पंधरा हजारांचे shares खरेदी केलेले आहेत. पण दोन दिवसांत राहिलेली रक्कम (ह्या उदाहरणात पाच हजार) तुम्हाला demat खात्यात जमा करावी लागते. जर तुम्ही उर्वरित रक्कम Dematला जमा केली नाही तर उधार (margin) रकमेवर (म्हणजे पाच हजारची) brokerage company व्याज लावते. एका विशिष्ट कालावधीनंतरही जर तुम्ही पैसे जमा नाही केले तर तुमचे आधीचे shares (Portfolioतिल Your Security Holding) परस्पर विकून आपले पैसे वसूल करते. ही सर्व प्रक्रिया आपला Demat खात्यावर होते अन आपल्याला त्या संबंधित सूचना मोबाइल अन ईमेल वर येत असतात. त्यामुळे, आपल्या holding वर जरी नवीन shares उधारीत खरेदी करण्याची सुविधा असली तरी पैसे जमा करता येणार असतील तरच Margin Trading चा लाभ घ्यावा, अन्यथा आहे ती गुंतवणूकही धोक्यात येऊ शकते. हा सर्व प्रकार बँकेच्या Credit Card सारखा आहे जेथे आपल्या saving खात्यावरील रक्कम, व्यवहार किंवा FD वर ती बँक उधार पैसे देते अन नंतर तुम्हाला ते bill भरावं लागतं. उदाहरण समजा, सोमवारी मला एका मित्राची गाडी आवडली. मी त्याला 50000 रुपये दिले आणि गाडी विकत घेतली. आता तांत्रिकदृष्ट्या ती गाडी माझी आहे, त्याने ती गाडी मला दिली पाहिजे. पण मंगळवारी RTO वगैरे कामे केल्याशिवाय ती गाडी माझ्या नावावर होणार नाही. त्यामुळे सोमवारी जारी मी ती गाडी घेतली तरी मंगळवारी त्याचं माझ्यानावाने register होईल अन मला बुधवारी ती मला मिळेल. याला T+2 days settlement म्हणतात. Today + 2 days. यामध्ये समजा, मंगळवारी मला कोणीतरी तीच गाडी 55000 हजारांना मागितली तर ??? तरीही मी ती गाडी त्यांना विकू शकतो. ह्या केसमध्ये, मंगळवारी मी त्यांच्याकडून पैसे घेईन, बुधवारी माझ्याकडे गाडी आल्यावर ती त्याच दिवशी तिसर्याय व्यक्तीच्या नावाने रजिस्टर करेन आणि गुरुवारी त्या गाडीची Delivery त्यांना देईन.
TYPES OF STOCKS // विविध प्रकारचे shares
|
Share काय असतो हे आपण बघितलं पण ते shares कोणकोणत्या प्रकारचे असतात ते बघूयात. Share बाजारात आठ हजारांपेक्षा जास्त कंपनीचे shares आहेत. त्यात रोजच्या व्यवहारात असलेली State Bank Of India पासून ते IT company Infosys, दुचाकी गाड्यांची कंपनी Bajaj, चहाची Tata Coffee अशा विविध प्रकारच्या कंपन्यांचे shares असतात. ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्या बाजारात असतात अन त्या क्षेत्रांना आपण Sector म्हणतो... Banking Sector मध्ये SBI, AXIS Bank, ICICI Bank, Bank Of Maharashtra अशा विविध बँका येतात. दुचाकी गाडी निर्मिती क्षेत्रात (sector) Bajaj, Hero Motocomp, TVS अशा कंपन्या येतात. औषधनिर्मिती क्षेत्रात Sunpharma, Cipla, Lupin अशा कंपन्यांचा समावेश होतो. FMCG (Fastly Moving Consumer Goods) अंतर्गत Asian Paints, Hindustan Unilever, ITC अशा रोजच्या वापरत लागणार्या वस्तूंची निर्मिती करणार्याr कंपन्या असतात. असे विविध सेक्टर असतात.
सर्व माहिती संग्रहीत
|
|
|